शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

जिल्हा खादी ग्रामोद्योग संघाच्या तीन जागा बिनविरोध?

By admin | Updated: August 25, 2015 23:39 IST

जिल्हा खादी ग्रामोद्योग संघाच्या तीन जागा बिनविरोध?

नाशिक : जिल्हा खादी ग्रामोद्योग सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मंगळवारी (दि.२५) अंतिम दिवशी १३ जागांसाठी २० उमेदवारांनी २४ अर्ज दाखल केले. त्यातील दोन महिला राखीव व अनुसूचित जाती संवर्गातील एका जागेसाठी तीनच अर्ज आल्याने या तीनही जागा बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. उर्वरित दहा जागांसाठी १७ उमेदवारांचे २१ अर्ज शिल्लक राहिले आहेत. येत्या २० सप्टेंबर रोेजी दहा जागांसाठी मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजय बोरसे यांनी दिली.जिल्हा खादी ग्रामोद्योग संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२५) उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस होता. त्यात सर्वसाधारण संवर्गातील आठ जागांसाठी १५ उमेदवारांचे १६ अर्ज आले. त्यात शंकरराव बर्वे, प्रकाश तांबट, प्रवीण कोठावदे, प्रमोद गर्गे, मकरंद सुखात्मे, वसंतराव हुदलीकर, दिलीप मोरे, भास्कर जाधव, काशीनाथ निमसे, पद्माकर पाटील, केदारनाथ सूर्यवंशी, कैलास सोनवणे, शिवाजीराव गाडे, अजय तांबट, अशोक करंजकर यांचा समावेश आहे. दोन महिला राखीव गटासाठी मानिनी कंसारा व अंजली आमले या दोन महिला उमेदवारांचेच अर्ज आले. तसेच अनुसूचित जाती जमाती संवर्गातून नगरसेवक परशुराम वाघेरे यांचा एकमेव अर्ज आहे. त्यामुळे या तीनही जागा बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. तसेच इतर मागास वर्गीय संवर्गातील एका जागेसाठी दिलीप मोरे, केदारनाथ सूर्यवंशी व संतोष सोनवणे हे तीन अर्ज दाखल झाले आहेत. भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी रमेशचंद्र घुगे व अशोक करंजकर हे दोन अर्ज शिल्लक आहेत. २६ आॅगस्ट रोजी छाननी होणार असून, त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. येत्या २० सप्टेंबर रोजी खादी ग्रामोद्योग संघासाठी मतदान होणार आहे. (प्रतिनिधी)