शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

उच्च दाबाच्या वाहिनीचा झटका लागून तिघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 00:53 IST

घराच्या गच्चीवर केबलचे काम करीत असताना गच्चीजवळून गेलेल्या उच्चदाबाच्या वाहिनीचा शॉक लागून तिघेजण जखमी झाल्याची घटना सिडकोतील दत्तनगर भागात घडली. या घटनेतील जखमीपैकी एकाची प्रकृती भंगीर असल्याचे समजते. या घटनेची माहिती परिसरात कळताच नागरिकांनी त्वरित विद्युत पुरवठा बंद करून जखमींन रुग्णालयात दाखल केले.

सिडको : घराच्या गच्चीवर केबलचे काम करीत असताना गच्चीजवळून गेलेल्या उच्चदाबाच्या वाहिनीचा शॉक लागून तिघेजण जखमी झाल्याची घटना सिडकोतील दत्तनगर भागात घडली. या घटनेतील जखमीपैकी एकाची प्रकृती भंगीर असल्याचे समजते. या घटनेची माहिती परिसरात कळताच नागरिकांनी त्वरित विद्युत पुरवठा बंद करून जखमींन रुग्णालयात दाखल केले. सिडको परिसरातील दत्त चौक भागात सोमवारी (दि. २८) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास कमलेश सोनवणे (३१, रा. मोरवाडी), रवि चव्हाण (१८, रा. मोरवाडी) व अन्य एक जण असे तिघे घराच्या गच्चीवर काम करीत होते. याचदरम्यान कमलेश यांना काम करीत असताना घराजवळील उच्च दाबाच्या केबलचा शॉक लागल्याने ते तारेलाच काही वेळ चिटकले, त्यावेळी विजेच्या तारेवर मोठया ज्वाळा उठल्या. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांना कळताच त्यांनी लगेचच जवळील महावितरण कंपनीच्या कार्यालयात संपर्क साधला मात्र त्यांनी फोन न उचलल्याने नागरिकांनी थेट कार्यालयातच धाव घेत वीजपुरवठा बंद करण्यास सांगितले. यानंतर परिसरातील विकास कुमावत, दशरथ तोटे, सागर पाटील, संतोष गायकवाड, दादाजी वाघ, प्रवीण महाले यांनी सोनवणे व अन्य दोघांना रुग्णालयात दाखल केले. यातील रवि चव्हाण व कमलेश यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, कमलेश हे गंभीर जखमी झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच परिसरात याआधीदेखील विजेचा शॉक लागून एका महिलेसह तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.विजेच्या तारांचा प्रश्न सुटला नाहीसिडको भागात अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरावरून उच्च दाबाच्या वीजतारा लोंबकळत असून, याबाबत महावितरण कंपनीकडून दखल घेतली जात नसल्याने वारंवार अशा घटना घडत असतात. दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवसात गच्चीवर पतंग उडवित असतानाही असे अनेक प्रकार घडले आहेत. याबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महासभा तसेच प्रभाग सभेत आवाज उठविला असला तरी अद्यापही विजेच्या तारांचा प्रश्न सुटू शकलेला नाही.