शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

छेड काढल्याप्रकरणी तिघांना अटक

By admin | Updated: September 12, 2014 00:41 IST

छेड काढल्याप्रकरणी तिघांना अटक

नाशिक : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सदिच्छानगर येथे मुलीची छेड काढल्याची व तिच्या शेजारच्या युवकाला मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली असून, एक अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले.सदिच्छानगर येथे राहणाऱ्या मुलीची संशयित अल्पवयीन मुलाने काही दिवसांपूर्वी छेड काढली होती व त्या मुलीला त्रास देत होता. याबाबत मुलीच्या आईने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांना शिवीगाळ केली व काही साथीदारांना बोलावून मुलीच्या शेजारी असलेला राजेष मल्लना मुदीगवडर (१९) व त्याचा मित्र शंतनू पाटील यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करत धारदार शस्त्राने वार करून त्यास गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी मुदीगवडर याने दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गफ ारमामा, नितीन पाटील, राजू डाखोरे यांच्यासह एका अल्पवयीन व त्यांच्या अज्ञात पाच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अल्पवयीन संशयितासह गफारमामा, राजू डाखोरे या तिघांना पोलिसांनी अटक केली असून, नितीनसह अन्य संशयितांचा शोध सुरू आहे.