शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेर दरोड्यातील तिघे जेरबंद

By admin | Updated: May 26, 2017 00:43 IST

नाशिक : येथील एका पेट्रोलपंपावर गावठी पिस्तूलचा धाक दाखवून सुमारे सात लाख १८ हजारांची रोकड लुटीच्या दरोड्यामधील तिघे संशयित फरार होते

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : पंधरवड्यापूर्वी संगमनेर येथील एका पेट्रोलपंपावर गावठी पिस्तूलचा धाक दाखवून सुमारे सात लाख १८ हजारांची रोकड लुटीच्या दरोड्यामधील तिघे संशयित फरार होते. या तिघांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-२ पथकाने नाशिकरोड भागात मुसक्या आवळल्या आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस शिपाई बाळा नांद्रे यांना गुप्त बातमीदाराकडून तीन इसम उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात गुन्हे शाखेच्या संपूर्ण पथकाने सापळा रचला. दरम्यान, तीन संशयित इसम या भागात फिरताना आढळून आले. ते एका पल्सर दुचाकीवरून या भागात येऊन पिस्तूल खरेदी करणाऱ्या ग्राहकाच्या प्रतीक्षेत होते. याचवेळी पथकाला खात्री पटल्यानंतर तिघांना शिताफीने अटक करण्यात आली. त्यांची अंगझडती घेतली असता देशी बनावटीचे पिस्तूल, मॅक्झीन व गुन्ह्यात वापरलेली एक पल्सर मोटारसायकल असा एकूण एक लाख दहा हजारांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी या तिघांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी महेश चिंधू ऊर्फ चिंतामण आंधळे (२३, रा. चेहेडी), महेश पांडुरंग लांडगे (२२, रा. वडगाव पिंगळा), सुमित अविनाश निरभवणे (२२, नाशिकरोड) यांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी काही साथीदारांच्या मदतीने पंधरा दिवसांपूर्वी संगमनेर येथील एका पेट्रोलपंपावर दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे. त्यांच्यावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या तिघांपैकी दोन संशयित हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापूर्वीही शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.