सिन्नर : सिन्नर-शिर्डी रस्त्यावर शुक्रवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास खासगी आराम बस, मालवाहू वाहन व ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या तिहेरी अपघात तीनजण ठार, तर काही जखमी झाले आहेत. शिर्डीकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करताना खासगी आराम बस (एमएच १५ एके ६३९९) व समोरून येणारा खासगी मालवाहू वाहन (एमएच १७, व्हीडी ५१५५) यांच्यात जोरदार धडक झाली. या अपघातात बस व मालवाहू वाहनातील तिघे ठार झाले. अपघातामुळे शिर्डी मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. जखमींना सिन्नरच्या विविध खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. (वार्ताहर)
तिहेरी अपघातात तीन ठार
By admin | Updated: October 22, 2016 02:26 IST