शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत अपघातात तिघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:16 IST

पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमृतधाम चौफुली येथे झालेल्या अपघातात औरंगाबाद महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून कंटेनरने धडक दिली. या ...

पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमृतधाम चौफुली येथे झालेल्या अपघातात औरंगाबाद महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून कंटेनरने धडक दिली. या अपघातात कंटनेर चालक ठार झाला तर क्लिनर जखमी झाला आहे. तसेच आडगाव शिवारातील एका लॉन्स जवळ पादचाऱ्याला एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पादचारी ठार झाला.

सोमवारी पहाटेच्या सुमारास कंटेनर (टी.एस ११ युसी ६२६१) उत्तर प्रदेश येथील चालक मनोजकुमार(२२) हा मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या अमृतधाम चौफुलीवरून वळण घेत तारवालानगरकडे जात असताना त्याचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. कंटनेर ट्रकवर पाठीमागून आदळला त्यात मनोजकुमार याच्या डोक्याला हातापायाला गंभीर मार लागल्याने मयत झाला तर क्लिनर सलुमुद्दीन कुतुबुद्दीन खान हा जखमी झाला आहे. अविचाराने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत स्वत:च्या मृत्यूस व क्लिनरच्या दुखापतीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक मनोजकुमार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरा अपघात आडगाव शिवारात घडला. सोमवारी साडेआठ वाजता मालेगाव येथे राहणारे देविदास धर्मा उशीर (३८) शिर्के कंपनीकडून हॉटेल मिरचीकडे पायी चालत जात असताना पाठीमागून भरघाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (एमएच १५ डीके १३४३) जबर धडक दिली. त्यात देविदास गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला याबाबत चालक संशयित जनार्दन दत्ता काशिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.