शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

वेगवेगळ्या अपघातांत युवतीसह तिघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 23:03 IST

सिन्नर : मालवाहतूक रिक्षातून पडून सोळा वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याची घटना हिवरगाव शिवारातील घंगाळवाडी फाट्याजवळ बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देराणी निवृत्ती पोमनार मयत युवतीचे नाव मुकेश नाईक याचा मृत्यू अनिल तानाजी केदार असे मृत युवकाचे नाव

सिन्नर : मालवाहतूक रिक्षातून पडून सोळा वर्षीय युवतीचा मृत्यू झाल्याची घटना हिवरगाव शिवारातील घंगाळवाडी फाट्याजवळ बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली.राणी निवृत्ती पोमनार (१६), रा. हिवरगाव असे मयत युवतीचे नाव आहे. राणी बहिणीसोबत वडांगळीला आठवडे बाजार करण्यासाठी गेली होती. बाजार करून दोघी बहिणी मालवाहतूक रिक्षाने घरी जात होत्या. यावेळी फाट्याजवळ चालत्या रिक्षातून खाली पडल्याने राणीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी राणीला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार एस. डी. गायकवाड आणि धनाजी जाधव अधिक तपास करत आहेत.दुचाकींची धडक; एक ठार, तीन जखमीसिन्नर : सिन्नर-घोटी रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात तालुक्यातील फर्दापूर येथील युवक ठार झाला, तर तिघेजण जखमी झाले आहेत. बुधवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. फर्दापूर येथील मुकेश अंबादास नाईक व त्याचा भाऊ अमोल नाईक हे दुचाकीहून सिन्नरकडून सोनारीला जात होते. सिन्नर-घोटी रस्त्यावर बंधन लॉन्सजवळ दोन दुचाकींची धडक झाली. या अपघातात मुकेश नाईक (३०) याचा मृत्यू झाला, तर अमोल जखमी झाला. त्याच्यावर सिन्नर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर समोरच्या दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. त्यांना एसएमबीटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.पांढुर्ली येथील युवक ठारपांढुर्ली-भगूर रस्त्यावर दारणा नदीच्या कथड्यावर आदळून दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. अनिल तानाजी केदार (२५, रा. पांढुर्ली) असे मृत युवकाचे नाव आहे. अनिल हे वडील तानाजी विश्वनाथ केदार (५५) यांच्या सोबत दुचाकीने (एमएच १५, ईएन ५८१५) बहिणीच्या विवाहाच्या कामानिमित्त भगूर येथे गेले होते. रात्री काम आटोपून बाप-लेक पांढुर्ली येथे घरी परतत होते. दारणा पुलावर समोरून आलेल्या वाहनाच्या तीव्र प्रकाशाने व त्यात समोरचे काही न दिसल्याने केदार यांची दुचाकी कथड्यावर जाऊन आदळली. या अपघातात अनिल केदार यांचा जागीच मृत्यू झाला, तर वडील तानाजी केदार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर नाशिक येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.