शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तीनशे स्कूल बसचालकांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:41 IST

मालेगाव : तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या लहान मुलांच्या शाळा अद्याप बंदच असल्याने त्यांची ने-आण करणाऱ्या सुमारे तीनशे स्कूल बसचालकांची ...

मालेगाव : तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या लहान मुलांच्या शाळा अद्याप बंदच असल्याने त्यांची ने-आण करणाऱ्या सुमारे तीनशे स्कूल बसचालकांची उपासमार होत असून, त्यांच्या अडचणीत भर पडली आहे. इतर कोणताही व्यवसाय नसल्याने उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न स्कूल बसचालकांपुढे पडला आहे.

कोरोनामुळे गेल्या मार्च महिन्यापासून अनेक उद्योग व्यवसाय ठप्प झाले. अनेकांच्या नोकऱ्या जाऊन बेरोजगार झाले. त्यानंतर हळूहळू काही व्यवसाय सुरू झाल्याने काही बेरोजगारांना पुन्हा काम मिळाले मात्र लहान मुलांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा अद्याप बंदच असल्याने स्कूल बसचालकांची उपासमार होत आहे. मालेगाव तालुक्यात उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे सुमारे २७५ स्कूल बसची नोंद आहे. अधिकृतरित्या शासन दरबारी पावणे तीनशे स्कूल बसचालकांची नोंद असली तरी काही शाळांमध्ये रिक्षाद्वारे मुलांना पालक शाळेत पोहोचवत असतात. रिक्षा सुरू झाल्याने मुलांना शाळेत पोहोचविण्याचे काम जरी त्यांच्याकडे नसले तरी ते इतर प्रवासी वाहतूक करीत आहेत. त्या तुलनेत शाळांच्या अधिकृत स्कूलबस बंदच असल्याने चालक बेरोजगार झाले आहेत.

इतर मोठ्या मुलांच्या शाळा राज्यात काही भागात सुरू झाल्या आहेत; मात्र लहान मुलांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू होण्याची चिन्हे दिसत नाहीत,खासगी इंग्रजी स्कूल सुरू नसल्याने त्या संस्थाचालकांपुढे शिक्षकांचे वेतन कसे द्यावे असा प्रश्न आहे. त्यात ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्याने लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न तसाच रेंगाळून आहे.

इन्फो

मजुरी करण्याची वेळ

खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये असणाऱ्या स्कूल बसचालकांना संस्थाचालकांकडून केवळ साडेसहा हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत वेतन देण्यात येते, परंतु सध्या कोरोनामुळे मिळणारे तुटपुंजे वेतनही बंद पडले असून संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे. त्यातील काही स्कूल बसचालकांनी शेतीवर मजुरीचे काम सुरू केले आहे तर काही स्कूल बस चालकांनी शहरात काम शोधणे सुरू केले आहे मात्र त्यातही कोरोना आडवा येत असून कोरोनाच्या दहशतीमुळे त्यांना शहरात देखील काम मिळविताना अडचण येत आहे.