शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

तीनशे बालके शिक्षणाच्या प्रवाहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 01:01 IST

नाशिक : प्रत्येक बालकाला शिक्षणाचा अधिकार मिळावा किंबहुना बालकांचा हा घटनात्मक अधिकार असून, वंचित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नाशिक जिल्ह्णात बालरक्षकांनी २८३ बालके शिक्षणाच्या प्रवाहात आणली आहेत.

ठळक मुद्देबालरक्षकांची कामगिरी : जिल्ह्यातील बालकांना शिक्षणाचा अधिकार

नाशिक : प्रत्येक बालकाला शिक्षणाचा अधिकार मिळावा किंबहुना बालकांचा हा घटनात्मक अधिकार असून, वंचित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नाशिक जिल्ह्णात बालरक्षकांनी २८३ बालके शिक्षणाच्या प्रवाहात आणली आहेत.२०१६ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात राज्यात इयत्ता आठवीपर्यंतच ४.२० लाख मुले शाळाबाह्ण असल्याची बाब समोर आली होती. या शाळाबाह्ण मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी महाराष्टÑ शासनाने ९ जानेवारी २०१७ मध्ये शासन निर्णय काढून ‘बालरक्षक पद’ तयार केले होते. बालकांच्या शिक्षण, हक्क व अधिकार यांचे जतन करणारी व्यक्ती म्हणजेच बालरक्षक आणि शिक्षकांनाचा ऐच्छिक स्वरूपात ही जबाबदारी देण्यात आली होती. नाशिक जिल्ह्णातील १ हजार १७९ शिक्षकांनी बालरक्षकाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांनी रस्त्यावर भीक मागणारी, खेळ करणारी आणि मोलमजुरी करणाऱ्या बालकांना यापासून परावृत्त करून शिक्षणासाठी प्रवृत्त करून शाळेच्या अंगणात आणले आहे.या बालरक्षकांनी मार्च ते सप्टेंबरअखेर २८३ शाळाबाह्य मुले शोधून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. केवळ आदिवासी, दुर्गम भागातील ही मुले नसून यातील बहुतांश मुले ही शहरालगत असलेल्या गावांत आढळून आली आहेत. त्यामध्ये स्थलांतरीत मुलांची संखा अधिक आहे.तालुकानिहाय प्रशिक्षणशाळाबाह्य मुलांना शोधण्याची मोहीम व्यापक राबविण्याच्या दृष्टीने बालरक्षकांनाजिल्हास्तरीय प्रशिक्षण देण्यात आले असून, आता डिसेंबरपासून तालुकानिहाय प्रशिक्षण दिले जाणार आहे.