शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

तीन अभियंत्यांना लाच घेताना रंगेहाथ अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:12 IST

रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केलेल्या ठेकेदाराच्या कामाच्या अंतिम देयक मंजूर करून ते अदा करण्यासाठी सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी तीन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण विभाग) कार्यकारी अभियंता देवेंद्र सखाराम पवार, सहायक अभियंता सचिन प्रतापराव पाटील व शाखा अभियंता अजय शरद देशपांडे या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि़१२) रंगेहाथ पकडले़

नाशिक : रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केलेल्या ठेकेदाराच्या कामाच्या अंतिम देयक मंजूर करून ते अदा करण्यासाठी सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी तीन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे (दक्षिण विभाग) कार्यकारी अभियंता देवेंद्र सखाराम पवार, सहायक अभियंता सचिन प्रतापराव पाटील व शाखा अभियंता अजय शरद देशपांडे या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि़१२) रंगेहाथ पकडले़लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक पंजाबराव उगले यांनी दिलेल्या माहितीनुसार येवला डांबर प्रकल्पाचे मालक मोहिते हे शासकीय ठेकेदार असून, त्यांनी गंगापूर डॅम ते दुगाव फाटा या रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी २८ टक्के कमी दराची निविदा भरली होती़ त्यानुसार त्यांना कंत्राट मिळाले व त्यांनी कामही पूर्ण केले़ या कामाचे अंतिम देयक मंजूर करून ठेकेदार मोहिते यांना पैसे अदा करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी पवार, पाटील व देशपांडे यांनी त्यांच्याकडे सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती़ याबाबत मोहिते यांनी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़मोहिते यांच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची खातरजमा करून शुक्रवारी सापळा रचला़ त्यानुसार कार्यकारी अभियंता पवार, सहायक अभियंता पाटील व शाखा अभियंता देशपांडे यांनी मोहिते यांच्याकडे सहा लाख रुपयांची मागणी केली़ त्यापैकी तीन लाख रुपये (दोन लाख रुपयांच्या मूळ चलन व १ लाख रुपयांच्या नकली चलन ) शाखा अभियंता अजय देशपांडे यांनी तक्रारदाराकडून सार्वजनिक बांधकाम विभाग (दक्षिण उपविभाग) कार्यालयात स्वीकारताच रंगेहाथ पकडण्यात आले़ लाचलुचपत खात्याने देशपांडे यांना रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांनी ही रक्कम कार्यकारी अभियंता (दक्षिण विभाग) देवेंद्र पवार व सहायक अभियंता सचिन पाटील यांच्या निदेशानुसार स्वीकारल्याची कबुली दिली़  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात धाव घेत कार्यकारी अभियंता देवेंद्र पवार व सहायक अभियंता सचिन पाटील यांना ताब्यात घेतले़ त्यांची कसून चौकशी केल्यानंतर मालमत्तेच्या चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आले़ दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या तिघांच्याही मालमत्तेची चौकशी सुरू होती़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक पी़बी़घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली़