शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शिंगवे तलावात बुडून मनमाडच्या तिघांचा मृत्यू

By admin | Updated: August 27, 2016 23:40 IST

चांदवड तालुका : पोहणे बेतले जिवावर

मनमाड/चांदवड : तालुक्यातील मतोबाचे शिंगवे येथील झाल्टे वस्तीजवळ असलेल्या पाझर तलावात मनमाडचे तीन युवक बुडून मरण पावल्याची घटना घडली आहे. शनिवारी (दि. २७) दुपारी २ वाजेच्या सुमारास मनमाड येथील छत्रे हायस्कूलचे पाच विद्यार्थी मतोबाचे शिंगवे येथील झाल्टे वस्तीजवळील पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते.यावेळी तेजस महावीर ललवाणी (१६) रा. जैन स्थानक, मनमाड, केशव संभाजी गायकवाड (१६), रा. आंबेडकर चौक, मनमाड, अजीम अजीब पठाण (१६) रा. आंबेडकर चौक, मनमाड हे तिघे पाण्यात पोहण्यासाठी उतरले. त्यांनी सेल्फी फोटोही काढले. पाण्याचा अंदाज न आल्याने ते मध्यभागी गेल्याने बुडाले. त्यांचे दोन मित्र शुभम मनोज कांबळे, रा. माधवनगर, मनमाड, स्वप्नील रवींद्र लोढा, रा. मुक्तांगण, मनमाड हे पाझर तलावाच्या काठावर उभे होते. तिघेही बुडाल्याचे लक्षात येताच त्यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्यांना काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शोधण्यास अडचणी येत होत्या. घटनेचे वृत्त समजताच मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे, चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, हवालदार सैंदाणे, मंगेश डोंगरे, कुशारे, चव्हाण, मोरे, कुमावत घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने मनमाड, मालेगाव येथील अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावले. या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून तीनही तरुणांना बाहेर काढले. मात्र ते तिघेही मृत पावले होते. घटनेचे वृत्त समजताच मनमाड येथील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली . हे पाचही विद्यार्थी छत्रे हायस्कुलचे विद्यार्थी होते. तिघांचे मृतदेह मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले. मनमाड शहरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. चांदवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ( वार्ताहर)