ओझर : येथून जवळच असलेल्य सय्यदपिंप्री येथे पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे.सय्यदपिंप्री येथील ग्रामपंचायतीच्या जागेवर असलेल्या खाणीत नंदू वराडे त्यांची पत्नी सविता वराडे व पुतण्या केशव वराडे असे तिघे जण बुडून मरण पावले.सदर खाणीत पंधरा फुटांच्या आसपास पाणी असून कपडे धुण्यासाठी पतीसह गेलेल्या सविता वराडे या पाण्यात पडल्याने त्यांना वाचवण्यासाठी पती नंदू वराडे हे मदतीला धावून गेले मात्र त्यांनाही पाण्याचा अंदाज आला नाही, दोघांना वाचवण्यासाठी पुतण्या केशव वराडे यानेही पाण्यात उडी घेतली व यातच तिघे दुर्दैवाने खोल पाण्यात बुडाले. अडीच तास शोध घेतल्यानंतर गळ टाकून तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, उत्तरीय तपासणीसाठी नासिक येथील शासकीय रु ग्णालयात पाठविण्यात आले आहे.पुढील तपास नाशिक तालुका पोलीस करत आहे.
सय्यदपिंप्री येथे तिघांचा बुुडुन मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 17:38 IST
ओझर : येथून जवळच असलेल्य सय्यदपिंप्री येथे पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाला आहे.
सय्यदपिंप्री येथे तिघांचा बुुडुन मृत्यू
ठळक मुद्देखाणीत पंधरा फुटांच्या आसपास पाणी