शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या

By admin | Updated: June 1, 2017 02:12 IST

वणी : दिंडोरी तालुक्यातील कोकणगाव खुर्द येथील एकाच कुटुंबातील तीन जणांची अज्ञात व्यक्तींनी निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : दिंडोरी तालुक्यातील कोकणगाव खुर्द येथील एकाच कुटुंबातील तीन जणांची अज्ञात व्यक्तींनी निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. मृतांत दाम्पत्यासह मुलाचा समावेश आहे. तिहेरी हत्याकांडाने तालुका हादरला आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा तीन संशयिताना पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.कोकणगाव खुर्द शिवारात टॉवरच्या माथ्यावर जगन्नाथ मुरलीधर शेळके (४५), शोभा जगन्नाथ शेळके (४२), हर्षद जगन्नाथ शेळके (२०), सोमनाथ जगन्नाथ शेळके (२१) असे चौघे वास्तव्यास होते. ते शेतीव्यवसाय करून उदरनिर्वाह करत. ३० मे रोजी लखमापूर फाटा येथे पिंटू पाटील यांच्या मुलीचा हळदीच्या कार्यक्रमासाठी सोमनाथ शेळके दुपारी ५ वाजेच्या सुमारास गेला होता. रात्री १० वाजता तो घरी परतला. त्यावेळी घरचा दरवाजा उघडा दिसला. तसेच टीव्ही सुरू होता. घरात कुणी दिसत नाही म्हणून त्याने स्वयंपाकघरात डोकावले असता हर्षद शेळके उंबरठ्यावर पडला होता. त्याच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. सोमनाथ याने त्याला उठविण्याचा प्रयत्न केला असता त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सोमनाथ याने आई-वडिलांना हाक मारली. मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सोमनाथ याने शेजारी राहणारे नातेवाईक सुधाकर शेळके व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना बोलावले. त्यांनीही हर्षदला उठविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी जगन्नाथ शेळके यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता स्वयंपाक घरालगतच्या खोलीतून भ्रमणध्वनीच्या रिंगचा आवाज आल्याने सर्व सदस्यांनी याठिकाणी धाव घेतली. याठिकाणी जगन्नाथ शेळके जमिनीवर मृतावस्थेत पडलेले होते. त्यांच्याही डोक्यातूून रक्त येत होते. तर शोभा शेळके यादेखील दुसऱ्या खोलीत मृतावस्थेत आढळून आल्या. याप्रकरणी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असता ते घटनास्थळावरच घुटमळले. प्रयोगशाळा अधिकारी, ठसे तज्ज्ञ यांनीदेखील घटनास्थळी भेट देत नमुने ताब्यात घेतले आहेत. व्हिसेरा राखून ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांच्या वतीने देण्यात आली.