शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांत सव्वाशे कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 01:26 IST

आयकर विभागाच्या छाप्यामुळे बाजार समित्यांमधील कांदा व्यापाºयांनी पुकारलेल्या अघोषित संपामुळे तीन दिवसांत सव्वाशे कोटींचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नाशिकच्या १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दिवसाला सरासरी दीडशे ते दोनशे क्ंिवटल कांद्याची आवक होते. कांद्याचा सरासरी ९०० ते १५०० रूपये प्रति क्विंटल भाव पाहता हे नुकसान सुमारे सव्वाशे कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात आले.

नाशिक : आयकर विभागाच्या छाप्यामुळे बाजार समित्यांमधील कांदा व्यापाºयांनी पुकारलेल्या अघोषित संपामुळे तीन दिवसांत सव्वाशे कोटींचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. नाशिकच्या १४ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दिवसाला सरासरी दीडशे ते दोनशे क्ंिवटल कांद्याची आवक होते. कांद्याचा सरासरी ९०० ते १५०० रूपये प्रति क्विंटल भाव पाहता हे नुकसान सुमारे सव्वाशे कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात आले.आवक वाढल्याने आधीच कांद्याचे भाव एका महिन्यात तेराशे रुपयांनी घसरल्याचे चित्र होते. त्यात आता दोन दिवसांपासून संप सुरू असल्याने कांद्याचे भाव आणखी गडगडले आहेत. केंद्र सरकारने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कांद्याचे भाव व अहवाल मागविला आहे. मागील महिन्यात २८०० रुपयांपर्यंत क्विंटलला गेलेला भाव एका महिन्याभरातच आवक वाढल्याने चक्क १५०० रुपयापर्यंत गडगडला आहे. मागील महिन्यात कांद्याचे वाढलेले भाव हे कृत्रिम असल्याचा दावा आता करण्यात येत आहे. इजिप्तच्या कांदा निर्यातीची भीती दाखवून कांदा उत्पादकांना एकाच वेळी कांदा बाजारात आणण्यास लावून कांद्याच्या भावात घसरण करण्याचे धोरण काही यंत्रणांकडून केले जात असल्याचा आरोप होतो आहे. त्यात धाडसत्रामुळे व्यापाºयांनी बाजार समित्यांना पत्र देऊन काही दिवसांसाठी लिलावात सहभागी होता येणार नाही, असे कारण दिले आहे. सरकारच्या नवीन धोरणामुळे कांदा साठवणुकीवर मर्यादा आली आहे. या मर्यादेमुळेच आता कांदा व्यापारी कांदा साठवणुकीस तयार नसून, त्यामुळे कांदा खरेदीही करण्यास नाखूश असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांचे म्हणणे आहे. ग्राहकांना आणि खरे तर मतदारांना चढ्या भावात कांदा खरेदी करणे भाग पडू नये कारण तसे झाले तर ते आपल्या विरोधात जाऊ शकते, यासाठी केंद्राची सारी धडपड असली तरी त्याला भाव पातळी स्थिर राहण्याचे कारण दिले जाते आहे. आता दोन दिवसांपासून बाजार समित्यांमध्ये व्यापाºयांनी पुकारलेल्या अघोषित संपामुळे कांदा उत्पादक वेठीस धरला जात आहे. कांदा उत्पादकांच्या अडवणुकीचे धोरण सरकारच्या धाडसत्राकडे अंगुलीनिर्देश दाखवून व्यापारी यंत्रणा काम करीत असल्याची चर्चा शेतकºयांमध्ये आहे.