शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

वर्षा लहाडे यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी : बेकायदेशीर गर्भपात प्रकरण

By admin | Updated: May 9, 2017 22:28 IST

जिल्हा रुग्णालयातील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या जिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ़ वर्षा लहाडे

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्हा रुग्णालयातील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या जिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ़ वर्षा लहाडे यांचा म्हसरूळ पोलिसांनी मंगळवारी (दि़९) ताबा घेतला़ लहाडे यांना न्यायालयात हजर केले असता १२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़ दरम्यान, सोनोग्राफी मशीन, गर्भपाताची औषधे याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे़डॉ. वर्षा लहाडे व प्रशिक्षणार्थी डॉ. कमलाकर जाधव यांनी पिंपळगाव बसवंतजवळील उंबरखेड येथील २४ आठवड्यांच्या गर्भवती महिलेचा जिल्हा शासकीय रुग्णालयात मार्च महिन्यात बेकायदेशीरपणे गर्भपात केला़ याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात एमटीपी तर म्हसरूळ पोलीस ठाण्यात शासकीय नोकरीत असतानाही विनानोंदणी दवाखाना सुरू केल्याबद्दल गुन्हा दाखल आहे़ लहाडे यांनी प्रारंभ अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला, मात्र सुनावणीदरम्यान अर्ज मागे घेत २८ एप्रिल रोजी त्या सरकारवाडा पोलिसांना शरण आल्या़ प्रथम वर्ग न्यायालयाने २९ एप्रिल ते ६ मे या कालावधीत त्यांना पोलीस कोठडी सुनावली़ पोलीस कोठडीच्या कालावधीत पोलिसांनी डॉ़ लहाडे यांच्या खासगी प्रयाग हॉस्पिटलची चौकशी तसेच गर्भपात केलेल्या अर्भकाचा मृतदेह उकरून त्याचे शवविच्छेदन केले़ पोलीस कोठडीची मुदत संपल्याने लहाडे यांना शनिवारी (दि.६) न्यायालयात नेले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली़ तर म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात न्यायालयाकडून म्हसरूळ पोलिसांनी मंगळवारी ताबा घेतला़ त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली़