शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

ओझर, कळवणच्या गटार सांडपाणी व्यवस्थापनासाठी तीन कोटी

By admin | Updated: August 19, 2014 01:19 IST

पिंंपळगाव, चांदवडचाही समावेश

कळवण : कळवण शहराचा वाढता विस्तार आणि त्यामुळे उदभवणारी समस्यांनी सर्वच वेठीला धरले जातात. त्यामुळे रस्ते, गटार व सांडपाणी या प्रमुख समस्या जनतेला भेडसावतात. शहराच्या गटार व सांडपाणीचे निर्मूलन कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नाबार्डकडून तीन कोटी ५६ लाख रुपये मंजूर झाले आहे. जिह्यातील कळवण, पिंपळगाव बसवंत, ओझर व चांदवड या चार शहरांमध्ये नाबार्डच्या अर्थसहाय्यतेतून ग्रामीण सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविला जावा, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सादर करण्यात आला होता. त्यास नुकतीच मंजुरी मिळाली असून यामध्ये राज्यातील सुमारे २८ गावांचाही समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून याबाबत सर्वेक्षण करण्यात येवून शासनस्तरावर अहवाल सादर करण्यात आला होता. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंत्या यांनी तांत्रिक मान्यता दिल्यानंतर शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. त्यानुसार कळवणसाठी ३ कोटी ५६ लाख रुपये, पिंपळगाव बसवंतसाठी ५ कोटी २७ लाख रुपये, चांदवडसाठी ५ कोटी ७७ लाख रुपये तर ओझरसाठी ५ कोटी ८० लाख रुपये मंजूर केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जयश्री पवार यांनी दिली.