शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या सोमवारी मिनिटाला तीन बसेस

By admin | Updated: August 9, 2014 00:50 IST

ब्रह्मगिरी : खासगी वाहनांना प्रवेश बंद; एकूण ४६० बसेस धावणार

नाशिक : तिसऱ्या श्रावणी सोमवारचे महत्त्व आणि ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता त्र्यंबकेश्वरसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या सुमारे ४६० बसेस धावणार असून, मिनिटाला तीन बस याप्रमाणे वाहतूक होईल. नित्याची वाहतूक कोंडी टाळून भाविकांचा प्रवास सुलभ होण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाचा प्रयत्न असेल, अशी माहिती विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली. ब्रह्मगिरी फेरीसाठी तिसऱ्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांची संख्या लाखांत असते. गेल्या वर्षी सुमारे पाच लाख भाविकांनी त्र्यंबकेश्वरला हजेरी लावली होती. यावेळी ही संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाच्या वतीने नियोजन केले जात आहे. त्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने वाहतूक, तसेच बंदोेबस्ताचेही नियोजन केले जात आहे. गेल्या काही वर्षांचा तिसऱ्या श्रावणी सोमवारचा अनुभव पाहता, भाविकांच्या सोयीसाठी महामंडळाच्या ४६० बसेस उपलब्ध केल्या आहेत. त्यात त्र्यंबकसाठी नाशिकहून २०९, नाशिकरोडहून ४०, निमाणीतून ३०, महामार्ग बसस्थानकातून २०, खंबाळे येथून २५, सातपूर येथून २५ असे नियोजन आहे. यासाठी महामंडळाचे २०० कर्मचारी तैनात आहेत. नाशिकमार्गे जाणाऱ्या बसेस मेळा बसस्थानकातून जाणार असल्याने येथून सायंकाळी ६ नंतर मिनिटाला तीन बसेस उपलब्ध असतील. मात्र, ब्रह्मगिरीची फेरी आणि तिसरा श्रावणी सोमवार यानिमित्ताने भाविक खासगी वाहनांतून येतात. रस्त्यालगत वाहने लावून फेरीसाठी निघून जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण होते. त्यामुळे बसच्या अपेक्षित फेऱ्या पूर्ण होऊ शकत नाहीत. यंदा मात्र त्र्यंबक रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने वाहतुकीची कोंडी टळेल आणि बसच्या माध्यमातून जास्त भाविकांच्या फेऱ्या होऊ शकतील, असे असले तरी प्रशासनाच्या वतीने यावेळीही त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)