शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक शहरात तीन घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 21:55 IST

नाशिक : इंदिरानगर, मुंबई नाका व सातपूर भागात गेल्या दोन दिवसांत तीन घरफोड्या झाल्याच्या घटना उघडकीस आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात घरफोड्यांचे सत्र सुरू असल्याने पोलिसांचा वचक राहिला नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून होत आहे.

ठळक मुद्देचोरट्यांची दहशत : इंदिरानगर, मुंबई नाका, सातपूर रहिवाशांमध्ये भीती

नाशिक : इंदिरानगर, मुंबई नाका व सातपूर भागात गेल्या दोन दिवसांत तीन घरफोड्या झाल्याच्या घटना उघडकीस आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात घरफोड्यांचे सत्र सुरू असल्याने पोलिसांचा वचक राहिला नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून होत आहे.पाथर्डी फाटा, आनंदनगर परिसरातील वास्तू रो-हाउसमध्ये कल्पेश अधिकराव पाटील (२९) यांच्या घरी १० आॅगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत घरफोडी झाली. चोरट्यांनी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून प्रवेश करत ३७ हजार रुपये किमतीची ५ ग्रॅम वजनाची अंगठी, ९ हजार रुपयांची तीन ग्रॅम सोन्याची कर्णफुले, १ ग्रॅ्रम सोन्याचे मणी व दहा हजार रुपये रोख असा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक ए. के. जगताप करीत आहेत.दुसरी घटना सातपूरमधील अमृतवाणी पाण्याच्या टाकीजवळ एमएचबी कॉलनीत बुधवारी (दि.४) रात्री साडेबारा ते सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान घडली. चोरट्यांनी प्रवीण मोहन सोन्स यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून ६२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यात २० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, १२ हजार रुपयांचे ब्रेसलेट, १० हजार रुपयांची सोन्याची अंगठी, दहा हजार रुपयांचा पिळदार वेढा, १० हजार रुपयांची कर्णफुले आदी दागिन्यांचा समावेश आहे. सोन्स यांची आई फ्रान्सला जाणार असल्याने ते कुटुंबासह आईला सोडण्यासाठी मुंबई विमानतळावर गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरफोडी केली. कडी-कोयंडा तोडून ऐवज लंपासमुंबई नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीची घटना घडली. अशोका मार्ग परिसरातील वाजिद मकसूद खान यांच्यासह त्यांच्या शेजारच्या घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी तब्बल ६५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यात पाचशे रुपयांच्या ३० नोटा असे १५ हजार व पाचशे रुपयांच्या शंभर नोटा असे ५० हजार रुपये एकूण ६५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. या प्रकरणी वाजिद खान यांनी पोलिसांत फिर्याद दिली.