शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

सातपूरला पेटविल्या तीन दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:53 IST

प्रेमभंगाच्या रागावरून सातपूरच्या प्रबुद्धनगरात शनिवारी (दि.२९) मध्यरात्रीच्या सुमारास एका संशयित प्रेमवीराने तीन दुचाकी पेटविल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच सातपूर गस्त पथकाने घटनास्थळी दाखल होऊन दुचाकी अग्निशामक दलाच्या बंब बोलावून विझविल्या.

नाशिक : प्रेमभंगाच्या रागावरून सातपूरच्या प्रबुद्धनगरात शनिवारी (दि.२९) मध्यरात्रीच्या सुमारास एका संशयित प्रेमवीराने तीन दुचाकी पेटविल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच सातपूर गस्त पथकाने घटनास्थळी दाखल होऊन दुचाकी अग्निशामक दलाच्या बंब बोलावून विझविल्या. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रबुद्धनगर परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एका माथेफिरू प्रेमवीराने प्रेमभंगाचा राग दुचाकींवर काढत पेट्रोल टाकून तीन दुचाकींना आग लावल्याची परिसरात चर्चा होती. मध्यरात्री घटनेची माहिती समजताच तत्काळ गस्त पथकावरील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत समोरील महिंद्र कंपनीतून अग्निशामक बंब बोलावला. पेटणाºया दुचाकींवर तत्काळ पाण्याचा मारा करून आग विझविली. दरम्यान, रविवारी (दि.२९) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास याप्रकरणी गुन्हा सातपूर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला. यानंतर तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही कॅमेºयांचे चित्रीकरण तपासले. चित्रीकरणामध्ये रात्रीचा प्रेमवीराचा प्रताप कैद झाला होता. या चित्रीकरणावरून संशयित प्रेमवीराचे धागेदोरे पोलिसांनी शोधत तपासाची चक्रे वेगाने फिरविली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश आखाडे, पोलीस उपनिरीक्षक शांतीलाल चव्हाण यांनी गुन्हे शोध पथकाच्या साहाय्याने चित्रीकरणात दिसणाºया संशयित अमित हिरामण जाधव (२१, रा.प्रबुद्धनगर) यास ताब्यात घेतले.नैराश्यातून पेटविली वाहनेजाधव याने गुन्ह्याची कबुली देत प्रेमभंगाचा राग आल्यामुळे दुचाकी पेटविल्याचे पोलिसांना चौकशीत सांगितले. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणावरून तत्काळ तपासचक्रे फिरवून संशयिताच्या मुसक्या आवळल्यामुळे दुचाकी जळीत कांडाचा उलगडा होऊन रहिवाशांना दिलासा मिळाला.