शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

धाडसी घरफोडी करणाºया तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 18:38 IST

मालेगाव : शहरातील नागछाप झोपडपट्टी भागात असलेल्या मणियार पोल्ट्री गोदामामधुन घरफोडी करुन अज्ञात चोरट्यांनी ३ लाख ४० हजार रुपयांची रोकड चोरुन नेली होती. याप्रकरणी शहर पोलीसांनी तपासाची चक्रे गतीमान करीत तिघा चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेली ३ लाख ४० हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्दे ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

मालेगाव : शहरातील नागछाप झोपडपट्टी भागात असलेल्या मणियार पोल्ट्री गोदामामधुन घरफोडी करुन अज्ञात चोरट्यांनी ३ लाख ४० हजार रुपयांची रोकड चोरुन नेली होती. याप्रकरणी शहर पोलीसांनी तपासाची चक्रे गतीमान करीत तिघा चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेली ३ लाख ४० हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी पत्रकार परिषदेत दिली.याप्रकरणी गेल्या २८ आॅक्टोबर रोजी जमील मोहंमद शरीफ मणियार या व्यापाºयाने शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन ३ लाख ४० हजारांची रोकड चोरुन नेल्याप्रकरणी फिर्याद दिली होती. पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्ही. एन. ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीसांनी अवघ्या ४८ तासात या धाडसी घरफोडीचा छडा लावला आहे. नागछाप झोपडपट्टीला लागलेल्या आगीची संधी साधत गोदामात कामाला असलेला अबु उर्फ मोहंमद सुफियान अतिक अहमद (२१), शाहरुख शहा युसुफ शहा (२२) रा. दोघे हजार खोली, राशीद उर्फ मोहंमद बेग उर्फ मोहंमद बेग सलीम बेद (२२) ा यांनी रोकड चोरल्याच्या संशयावरुन पोलीसांनी अटक केली होती.अबु उर्फ मोहंमद सुफियान अतिक अहमद याच्या घराची पोलीसांनी झडती घेत त्याच्या घरातील बंद कुलरमध्ये ७० हजार रुपये तर शाहरुख शहा युसुफ शहा याच्या घरातील फ्रीजमध्ये १ लाख ३८ हजार, राशीद उर्फ मोहंमद बेग याच्या घरातील कपाटातुन १ लाख ३२ हजार रुपये असे एकूण ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.