शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

बॅँकेच्या तगाद्यामुळे आत्महत्येची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:28 IST

जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने कर्ज वसुली मोहिमेंतर्गत शनिवारी मातोरी येथे कर्जदार शेतकऱ्याच्या घरी वसुली पथक धडकल्याने गावात व नातेवाइकांमध्ये बदनामी झाल्याने गावातील शेतकरी साहेबराव कातड व त्यांचे कुटुंबीय व्यथित झाले असून, शासनाने दुष्काळ जाहीर करून कर्ज वसुलीला स्थगिती दिली असतानाही बॅँकेचे अधिकारी वसुलीसाठी तगादा लावत असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी अन्यथा आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.

मातोरी : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने कर्ज वसुली मोहिमेंतर्गत शनिवारी मातोरी येथे कर्जदार शेतकऱ्याच्या घरी वसुली पथक धडकल्याने गावात व नातेवाइकांमध्ये बदनामी झाल्याने गावातील शेतकरी साहेबराव कातड व त्यांचे कुटुंबीय व्यथित झाले असून, शासनाने दुष्काळ जाहीर करून कर्ज वसुलीला स्थगिती दिली असतानाही बॅँकेचे अधिकारी वसुलीसाठी तगादा लावत असल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी अन्यथा आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.  गेल्या काही दिवसांपासून जिल्हा बँकेचे कर्मचारी तालुक्यातील कर्जदार शेतकºयाच्या घरी जात असून, त्यांना कर्ज भरण्याचे आवाहन करण्याबरोबरच मालमत्ता जप्त करण्याची तसेच शेतीवर बोजा चढविण्याची धमकीही देत आहेत. बॅँकेच्या या धमकीमुळे कर्जदार शेतकरी भयभयीत झाले आहेत. शनिवारी अशाच प्रकारे जिल्हा बॅँकेच्या वसुली पथकाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी मातोरीत येऊन कर्जदारांच्या घरावर धडक दिली. बॅँकेच्या या कारवाईमुळे संसार उघड्यावर येईल या भीतीबरोबरच, समाजात बदनामी व नाचक्की होण्याचा धसका घेतला आहे. अशाच भीतीमुळे गावातील साहेबराव एकनाथ कातड या शेतकºयाने जिल्हाधिकारी, उपनिबंधक, विभागीयसह निबंधकांना तक्रार अर्ज दिला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सोसायटीचे सचिव सोनावणे तसेच बँकेच्या अधिकाºयांना सततच्या नापिकीने पिकाला भाव मिळत नसल्याने कर्ज फेडता येत नसल्याने स्वत:च्या मालकीची थोडीफार जमीन विकून कर्ज फेडतो, अशी विनंती केली होती.  तरीदेखील बँकेने ४० ते ५० लोक घरी पाठविले व २६ तारखेपर्यंत पैसे भर अन्यथा तुमच्या सर्व जमिनीचा लिलाव करून टाकू, असा दम भरून कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे.कारवाईची मागणीगावात व्हॉट्सअप मॅसेजद्वारे सर्व ग्रुपवर फोटो टाकून नाहक बदनामी चालविली असून, त्यामुळे व्यथित होऊन मला व माझ्या कुटुंबाला आत्महत्या करण्याची इच्छा होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. बॅँकेच्या अधिकारी, कर्मचारी, सोसायटीचे कर्मचाºयांवर सात दिवसांत कारवाई न केल्यास विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :bankबँकFarmerशेतकरी