शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

हजारो वनवासींचे तीर्थस्नान

By admin | Updated: September 15, 2015 23:36 IST

कपिला-गोदा संगम : भव्य शोभायात्रेने वेधले नाशिककरांचे लक्ष

नाशिक : जातीपातीचे बंध तोडून अखिल हिंदू एक व्हावा, समरसता प्रस्थापित व्हावी तसेच धर्मावरील लोकश्रद्धा अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने गोदाघाटावरील कपिला-गोदा संगमावर हजारो हिंदू वनवासी बांधवांनी तीर्थस्नान केले. यावेळी सुरत येथील जगद्गुरू वल्लभाचार्य यांच्या हस्ते तीर्थपूजन करण्यात आले. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय धर्मजागरण विभागाच्या वतीने पंचवटीतील हिरे महाविद्यालयात वनवासी बांधवांच्या दोनदिवसीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या दशकात हिंदू धर्म सोडून अन्य धर्मांत गेलेल्या वनवासी बांधवांना ‘घरवापसी’ कार्यक्रमाद्वारे हिंदू धर्मात आणण्याचे काम धर्मजागरण विभागाकडून सुरू आहे. या संमेलनानिमित्त अशा धर्मांतरित वनवासींसह देशभरातील हजारो वनवासी बंधू-भगिनी नाशिकमध्ये एकत्र आले आहेत. या बांधवांनी आज सकाळी तपोवनातील कपिला-गोदा संगमावर मिरवणुकीद्वारे येऊन स्नानाची पर्वणी साधली.सकाळी ९ वाजता जगद्गुरू वल्लभाचार्य महाराजांच्या नेतृत्वाखाली या वनवासी बांधवांची शोभायात्रा काढण्यात आली. रामनामाचा गजर, भारत मातेचा जयजयकार करीत ही मिरवणूक पंचवटी महाविद्यालयापासून तपोवनमार्गे कपिला-गोदा संगमावर दाखल झाली. मिरवणुकीत हुतात्मा शिरीषकुमार मर्दानी खेळ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दांडपट्ट्याच्या मर्दानी खेळाचे थरारक दर्शन घडवले. लोकमान्य विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे लेजीम पथक व रामराज्य ढोलपथकही मिरवणुकीत सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)