शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

महापौरपदाची शंभरी, अजुनी नाही तरतरी

By admin | Updated: December 26, 2014 00:08 IST

अडथळ्यांची शर्यत सुरूच : मनसेचे इंजिन धावतेय धिम्या गतीने

नाशिक : पाच दिवसांपूर्वी २० डिसेंबरला मनसेचे अशोक मुर्तडक (राज ठाकरे यांच्या भाषेत ‘चायना वॉल’) यांच्या महापौरपदाला शंभर दिवस पूर्ण झाले. पदभार स्वीकारल्यानंतर राज ठाकरे यांच्या स्वप्नातील नाशिकची संकल्पना मूर्त स्वरूपात उतरविण्याचा निर्धार व्यक्त करणाऱ्या महापौरांचा शंभर दिवसांचा प्रवास पाहिला, तर महापौरांची अजूनही अडथळ्यांची शर्यत सुरूच असून, कार्यपद्धतीत अपेक्षित अशी तरतरी नसल्याने मनसेचे इंजिन धिम्या गतीनेच धावते आहे.नाशिकचे चौदावे महापौर म्हणून मनसेचे अशोक मुर्तडक यांनी दि. १२ सप्टेंबर रोजी निवड झाली. मुर्तडक यांच्या रूपाने आणि राष्ट्रवादीच्या मदतीने मनसेने महापालिकेतील सत्ता कायम राखली. मुर्तडक यांची महापौरपदी निवड झाली आणि त्याच दिवशी विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे महापौरांना अगदी पहिल्या दिवसापासून कामांचा धडाका सुरू करता आला नाही. विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आटोपल्यानंतर २० आॅक्टोबरला आचारसंहिता शिथिल झाली आणि त्यानंतर झालेली महासभा दिवंगतांना श्रद्धांजली वाहून तहकूब करण्यात आली. आचारसंहिता संपल्यानंतर आता कामाला सुरुवात करावी, अशी वेळ येऊन ठेपली असताना पक्षांतर्गत आव्हाने समोर ठाकली गेली. माजी आमदार वसंत गिते, प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक आणि जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र उगारत अस्वस्थता निर्माण केली. त्यामुळे पालिकेतील मनसेच्या नगरसेवकांमध्येही अप्रत्यक्षपणे गटतट निर्माण झाले. राज ठाकरे यांनी राजीनामास्त्र देणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवून त्यातील हवा काढून घेतली; परंतु महापौरांसमोरील अडचणी काही कमी झाल्या नाहीत. महापौरांनी पदभार स्वीकारला त्याचवेळी पालिकेला पूर्णवेळ आयुक्त नव्हता. १३ एप्रिल ते ५ नोव्हेंबर या कालावधीपर्यंत आयुक्त नसल्याने महापालिकेचेही कामकाज थंडावले होते. महापौरांच्या शंभर दिवसांच्या कार्यकाळात महापालिकेला तर सुमारे दोन महिने तर पूर्णवेळ आयुक्तच नव्हते. १० नोव्हेंबरला डॉ. प्रवीण गेडाम यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आणि त्यांनीही अभ्यासात गुंतवून घेतल्याने नगरसेवकांची कामे रखडली. परिणामी, महापौरांना आता नगरसेवकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. महापौरांनी डेंग्यूने थैमान घातले तेव्हा शहरात स्वच्छता मोहीम राबविली, त्यानंतर शहरातील उद्यानांना भेटी देत पाहणी केली आता प्रभागांचे दौरे सुरू केले आहेत. शंभर दिवस उलटूनही महापौरांना पाहिजे तशी पकड घेता आलेली नाही. (प्रतिनिधी)