नांदगाव : शहर पाणीपुरवठा योजनेची शांतिबाग भागाला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी मंगळवारी सकाळी फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर व आजूबाजूला पसरून तळे साचले. मुख्य जलवाहिनीपासून निघणारा पाईपच तुटल्याने सदर प्रकारघडला. शासकीय विश्रामगृहाला या वाहिनीमधून जोडणी देण्यात आली आहे. दहेगाव धरणातले पाणी यावेळी संबंधित भागाला देणे सुरू होते.
नांदगावी जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 18:39 IST