नाशिक : पंचवटी व भद्रकाली परिसरात चोरट्यांनी घरफोडी करून हजारो रुपयांचा ऐवज चोरून नेला़ त्यामध्ये एका फॅब्रिकेटर दुकानातील साहित्य व सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे़मालेगाव स्टॅण्डवरील न्यू सयान रोलिंग फॅब्रिकेटर्स या बंद दुकानाचे कुलूप तोडून शटर उघडून चोरट्यांनी दोन वेल्डिंग मशीन, ड्रिलिंग मशीन, सिंगल फेज वायर असा १९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ याप्रकरणी गुरुजितसिंग सयान (धात्रक फाटा, मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़घरफोडीची दुसरी घटना भद्रकालीतील नानावलीमध्ये भरदिवसा घडली़ कृपाशंकर कश्यप (रा़ नानावली) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सकाळी अकरा ते साडेअकरा वाजेच्या सुमारास घरात प्रवेश केला़ यानंतर घरातील बारा हजार २०० रुपये किमतीचे कानातील अडीच ग्रॅम सोन्याचे झुपके, चांदीच्या तोरड्या असा ऐवज चोरून नेला़ याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)
घरफोड्यांमध्ये हजारोंचा ऐवज लंपास
By admin | Updated: February 3, 2017 01:17 IST