कसबे सुकेणे : हजारो महानुभाव पंथीय व संत महंतांचे श्रद्धास्थान असलेल्या मौजे सुकेणे येथील दत्त मंदिराच्या वतीने ५१ हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीला देण्यात आली. महंत मनोहरशास्त्री सुकेणेकर, अर्जुनराज सुकेणेकर, बाळकृष्णराज सुकेणेकर, गोपीराजशास्त्री सुकेणेकर, राजधरराज सुकेणेकर यांनी या मदतीचा धनादेश आमदार दिलीप बनकर यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी गुलाब काळे, संभाजी सुर्वे, पुंडलिक घोलप आदी उपस्थित होते.
दत्त मंदिर संस्थानतर्फे एकावन्न हजारांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 23:10 IST