शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हजारो हातांनी साकारले ‘हिरवे भविष्य’

By admin | Updated: June 6, 2015 00:32 IST

फाशीचा डोंगर : अकरा तासांत विक्रमी अकरा हजार रोपांची लागवड

नाशिक : गंगापूर शिवारातील फाशीच्या डोंगरावर लोकसहभागातून अकरा हजार रोपांची लागवड करत ‘मेगा वनमहोत्सव’ साजरा करण्यात आला. याप्रसंगी हजारो आबालवृद्धांनी अकरा तासांमध्ये ४५ एकर जागेवर अकरा हजार रोपे लावून ‘सुंदर नाशिक, हरित नाशिक’ ही संकल्पना पर्यावरण दिनाच्या औचित्यावर सार्थकी लावली अन् ‘हिरवे भविष्य’ साकारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.वन विभागाच्या फाशीच्या डोंगरावरील जागेवर आपलं पर्यावरण ग्रुप या पर्यावरणप्रेमी संघटनेच्या वतीने लोकसहभागातून अकरा हजार रोपे लावण्याचा संकल्प सोडण्यात आला होता. यासाठी या संघटनेचे सर्व स्वयंसेवक महिनाभरापासून कठोर परिश्रम घेत होते. त्यांच्या परिश्रमाचे फलित म्हणून या ठिकाणी नाशिककरांनी आपले कुटुंब व मित्रपरिवारासह उगवत्या दिनकराच्या साक्षीने पर्यावरणपूरक रोपांच्या लागवडीसाठी धाव घेतली होती. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत प्रत्येक वृक्षप्रेमी नाशिककराने या वनमहोत्सवामध्ये स्वयंस्फूर्तीने सहभागी होत पर्यावरणप्रेम व्यक्त केले. शहरातील विविध खासगी इंग्रजी-मराठी माध्यमांच्या शाळांचे विद्यार्थी, महाविद्यालयांचे विद्यार्थी, सेवाभावी संस्थांचे सदस्य, विविध महिला मंडळ, मित्रमंडळ, ज्येष्ठ नागरिक मंडळ, पर्यावरणप्रेमी संस्था, प्राणी-पक्षिप्रेमी संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या वनमहोत्सवामध्ये सहभागी झाले होते. तसेच सातपूरमधील विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनीही दुपारच्या वेळेत हजेरी लावून रोपांची लागवड केली. महापौर अशोक मुर्तडक, आमदार सीमा हिरे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी येथे हजेरी लावून वृक्षारोपण केले. (प्रतिनिधी)