शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला आजपासून भुसार मालाचे लिलाव

By admin | Updated: November 3, 2015 21:59 IST

चांदवडला आजपासून भुसार मालाचे लिलाव

 चांदवड : चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांसाठी भुसार माल विक्रीची जवळच सोय उपलब्ध व्हावी व वेळ, खर्चाची बचत व्हावी याकरिता मुख्य बाजार आवार, चांदवड येथे बुधवारी (दि. ४) सकाळी ११ वाजता भुसार मका, सोयाबिन, गहू, बाजरी आदि शेतमालाच्या नियमित लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या हस्ते होणार आहे. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील मका, सोयाबिन, बाजरी काढणीचा हंगाम सुरू झालेला आहे. शेतकऱ्यांना भुसार माल विक्रीची जवळची सोय उपलब्ध व्हावी याकरिता भुसार शेतमालाचे लिलाव सुरू करण्याबाबत बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या अध्यक्षतेखाली भुसार आडते, खरेदीदार व्यापारी यांची सभा घेण्यात आली. सदर सभेत चांदवड येथील मुख्य बाजार आवारात भुसार मालाचे लिलाव दि. ४ नोव्हेबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपसभापती नितीन अहेर, भुसार व्यापारी गणेश वाघ, राजेंद्र अजमेरे, विष्णू शिंदे, अंकुर कासलीवाल, प्रशांत सोनवणे, संतोष जाधव, पुंजाराम हांडगे आदि उपस्थित होते. भुसार शेतमाल विक्रीची रक्कम रोख स्वरूपात अदा केली जाणार आहे. (वार्ताहर)