शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

थर्टी फर्स्टला तळीरामांवर पोलिसांची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:27 IST

सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत अर्थात थर्टी फर्स्टचे प्लॅनिंग ठिकठिकाणी सुरू झाले आहे. त्यातच रात्री उशिरापर्यंत मद्यविक्रीस परवानगी देण्यात येत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे़

नाशिक : सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत अर्थात थर्टी फर्स्टचे प्लॅनिंग ठिकठिकाणी सुरू झाले आहे. त्यातच रात्री उशिरापर्यंत मद्यविक्रीस परवानगी देण्यात येत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे़ या थर्टी फर्स्टला शहरात पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे दोन हजार पोलीस कर्मचाºयांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असून १५ ब्रेथ अ‍ॅनालायझरच्या साहाय्याने तळीरामांची तपासणी केली जाणार आहे़राज्य सरकारने ३१ डिसेंबर रोजी बिअर व वाइन शॉपी तसेच देशी दारू दुकानांना रात्री १ वाजेपर्यंत तर दुसºया दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत परमिट रूम/ बिअर बार उघडे ठेवण्याचे आदेश दिले आहेत़ या पार्श्वभूमीवर शहरातील चार पोलीस उपायुक्त, आठ सहायक पोलीस आयुक्त, पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह कर्मचाºयांच्या साप्ताहिक सुट्या रद्द करण्यात आल्या असून, पोलीस ठाणेनिहाय विशेष गस्त पथक तयार करण्यात आले आहे़पोलीस आयुक्तालयातील तेराही पोलीस ठाणे हद्दीत किमान तीन नाकाबंदी पॉइंट असून, त्यानुसार अधिकारी व कर्मचारी तैनात केले जाणार आहेत़ पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचाºयांना दोन फेजमध्ये बंदोबस्त लावण्यात आला आहे़ शहर वाहतूक शाखेतर्फे महामार्ग, औरंगाबादरोड, पुणेरोड, त्र्यंबकरोड, गंगापूररोड, कॉलेजरोड, पेठरोड, दिंडोरीरोड, शहरातील प्रमुख चौक व प्रमुख रस्त्यांवर ४२ ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे़शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत केल्या जाणाºया नाकाबंदीच्या ठिकाणी वाहतूक शाखेचे पंधरा अधिकारी व २७२ कर्मचारी तैनात केले जाणार असून, १५ ब्रेथ अ‍ॅनालायझरच्या साहाय्याने मद्यपी वाहनचालकांची तपासणी केली जाणार आहे़ यावेळी हुज्जत घालणाºया नागरिकांसाठी १३० बॉर्डी वॉर्न कॅमेराद्वारे छायाचित्रणही केले जाणार आहे़  तसेच पोलिसांच्या नजरेतून एकही मद्यपी वाहनचालक सुटणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे़ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची कारवाईथर्टी फर्स्टला वाहतूक पोलिसांकडून ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनच्या साहाय्याने वाहनचालकांची तपासणी केली जाणार आहे़ या मशीनद्वारे शरीरात किती अल्कोहोल आहे हे समजणार असून, मद्यपी वाहनचालकांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची कारवाई केली जाणार आहे़कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशा प्रकारे ३१ डिसेंबर साजरा करू नये़ शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, वाहनचालकांची ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनच्या साहाय्याने वाहनचालकांची तपासणी केली जाणार आहेत़ त्यामुळे नागरिकांनी नववर्षाचे स्वागत करताना पोलिसी कारवाईला सामोरे जावे लागणार नाही याबाबत दक्षता घ्यावी़- लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपआयुक्त, नाशिक