शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

संसरी गावाला तिसऱ्यांदा खासदार पद मिळण्याने जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 01:53 IST

संसरी गावाला तिसऱ्यांदा खासदार पद मिळण्याचे भाग्य लाभले असून, खासदार हेमंत गोडसे यांनी नाशकात दुसºयांदा विजयी होऊन इतिहास रचला आहे.

नाशिकरोड : संसरी गावाला तिसऱ्यांदा खासदार पद मिळण्याचे भाग्य लाभले असून, खासदार हेमंत गोडसे यांनी नाशकात दुस-यांदा विजयी होऊन इतिहास रचला आहे. गोडसेंचा विजय निश्चित होताच संसरी गावात व त्यांच्या घरी महिला व ग्रामस्थांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला.लोकसभा निवडणुकीत नाशिकला सलग दुसºयांदा खासदार निवडून येत नाही, असा गेल्या काही वर्षांतील इतिहास आहे. तरीदेखील शिवसेनेने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली. गुरु वारी मतमोजणी प्रक्रि या सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच गोडसेंनी विजयाच्या मार्गावर मार्गक्र मण करण्यास सुरु वात केली होती. प्रत्येक फेरीला गोडसे हे मताधिक्य घेत आघाडीवर राहिले. मतमोजणी सुरू होण्याच्या वेळी खासदार गोडसे यांच्या पत्नी अनिता या गावातील मारु ती मंदिरात सकाळपासून पोथी वाचत देवाला विजयाचे साकडे घातले. दुपारपासून मतमोजणीदरम्यान गोडसे यांचे मताधिक्य जसे वाढू लागले तसे संसरीतील गोडसेंच्या घरी ग्रामस्थ व परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांची गर्दी वाढू लागली होती. सायंकाळी गोडसेंनी दोन लाखांच्यावर आघाडी घेतल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित झाल्याने त्यांच्या घरी ढोल-ताशांच्या गजरात जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली होती. सलग दुसºयांदा खासदार म्हणून निवडून येण्याचा इतिहास हेमंत गोडसे यांनी केल्याने प्रत्येकाच्या चेहºयावरून आनंद ओसंडून वाहत होता. लॅमरोड व संसारी गावात आदी सर्व ठिकाणी मोठा आनंद व्यक्त करण्यात आला. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. मध्यरात्री उशिरापर्यंत लॅमरोड संसरी देवळाली गाव व आजूबाजूच्या भागांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण बघावयास मिळाले. संसरी गावाबरोबरच आजूबाजुच्या पंचक्रोशीत देखील गोडसे यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या देवळाली मतदारसंघातील गावागावात गोडसे यांच्या विजयाचा गुलाला उधाळण्यात आला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnashik-pcनाशिक