शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

वाडीवऱ्हे सोने लुटीतील तिसऱ्या संशयितास अटक

By admin | Updated: May 3, 2015 01:47 IST

वाडीवऱ्हे सोने लुटीतील तिसऱ्या संशयितास अटक

वाडीवऱ्हे सोने लुटीतील तिसऱ्या संशयितास अटक  नाशिक : जिल्'ातील सर्वांत मोठ्या ५८ किलो सोने लुटीच्या कटामध्ये सहभागी असलेले व वाहनाची इत्यंभूत माहिती दरोडेखोरांना देणाऱ्या दोघा संशयितांच्या अटकेपाठोपाठ पोलिसांनी शुक्रवारी (दि़१) आणखी एका संशयितास अटक केली़ तपासाच्या कारणास्तव या संशयिताचेही नाव गोपनीय ठेवण्यात आले असून, त्यास इगतपुरी न्यायालयाने बारा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़ या तिघांच्या अटकेमुळे लवकरच या सोने लुटीचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तविली जाते आहे़ २४ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास वाडीवऱ्हेजवळ पाच तोतया पोलिसांनी जिल्'ातील सर्वांत मोठा दरोडा टाकला़ ‘झी’ गोल्ड कंपनीचे ६० किलो सोने अंधेरी येथील सिक्वेल सिक्युरीटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सुरक्षा अधिकारी समीर मन्वर पिंजारा, वाहनचालक नावेद अहमद, सुरक्षारक्षक प्रदीप दुबे व संतोष साऊ हे शिरपूरच्या रिफायनरीमध्ये पोहोचविण्यासाठी वाहनाने (एमएच ०२ सीई ४०१०) जात होते़ मुंबई-आग्रा महामार्गावरील वाडीवऱ्हेजवळ पांढऱ्या रंगाच्या लोगान कारमधून आलेल्या पाच तोतया पोलिसांनी हे वाहन अडविले़ या वाहनातील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून ६० किलो सोन्यापैकी सोळा कोटी २३ लाख रुपयांचे ५८ किलो सोने घेऊन ते फरार झाले़