शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

घुसखोरी रोखण्यासाठी ‘तिसरा डोळा’ ठेवणार लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 01:01 IST

नाशिक : नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्यातील पाणथळ जागेवर मासेमारीच्या जाळ्यात अडकून १८ पक्षी मरण पावले. या प्रकरणी वन्यजीव विभागाने गुन्हा दाखल केला होता. घुसखोरी रोखण्यासाठी चोरवाटांवर ‘तिसरा डोळा’ लक्ष ठेवणार आहे. वन्यजीव विभागाने ३६० अंशात फिरणारे व जास्त मीटरपर्यंत दिवस-रात्र चित्रीकरणाची क्षमता ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक : नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्यातील पाणथळ जागेवर मासेमारीच्या जाळ्यात अडकून १८ पक्षी मरण पावले. या प्रकरणी वन्यजीव विभागाने गुन्हा दाखल केला होता. घुसखोरी रोखण्यासाठी चोरवाटांवर ‘तिसरा डोळा’ लक्ष ठेवणार आहे. वन्यजीव विभागाने ३६० अंशात फिरणारे व जास्त मीटरपर्यंत दिवस-रात्र चित्रीकरणाची क्षमता ठेवणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे.अभयारण्य क्षेत्रात विनापरवाना वावर कायद्याने गुन्हा ठरतो; मात्र मासेमारी करणाऱ्याकडून सर्रासपणे घुसखोरी केली जाते. मासेमारीचे जाळे टाकून घुसखोर फरार होतात. अनकेदा पक्षी अडकून जायबंदी होतात. आठवडाभरापूर्वी १८ पक्ष्यांचा जाळ्यात तडफडून मृत्यू झाला होता. अभयारण्य संरक्षणासाठी व्यवस्थापन आराखड्यानुसार उपाययोजना वन्यजीव विभागाने आखल्या आहेत. याअंतर्गत महिनाभरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित होतील, अशी माहिती वनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दिली. चापडगाव संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून पुढे जलाशयात एक सीसीटीव्ही कार्यान्वित आहे.चापडगाव संकुल येथून मुख्यत: अधिकृत प्रवेश अभयारण्याच्या क्षेत्रात दिला जातो; मात्र काही गावांमधून चोरवाटा तयार करण्यात आल्या आहे. गस्ती पथकाने या शोधल्या असून, त्यावर पथक नजर ठेवून आहेत. संध्याकाळनंतर अभयारण्याच्या प्रदेशात प्रवेश करून जलाशयात मासेमारी करण्याकरिता जाळे टाकणाºयांवर कारवाई करणे कॅमेºयांमुळे सोपे होणार आहे.सहायक वनसंरक्षक भरत शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे, वनपाल अशोक काळे, इको-एको संस्थेचे अभिजित महाले, वैभव भोगले आदी उपस्थित होते.रात्री चालणारे गैरप्रकार होणार ‘कैद’ज्या भागातून मासेमारीकरिता प्रवेश केला जातो त्या भागात रात्रीच्या वेळीदेखील स्पष्टपणे हालचाल टिपली जाईल, या क्षमतेचे कॅ मेरे वाढविण्यात येणार आहे. फेब्रुवारीअखेर किमान पाच कॅमेरे कार्यान्वित होणार असून, पुढील सहा महिन्यांत पंधरा ते वीस कॅमेºयांच्या देखरेखीखाली अभयारण्य येणार आहे.