शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘तिसरा डोळा’ निष्क्रिय

By admin | Updated: June 27, 2016 00:32 IST

मध्यवर्ती कारागृह : कैद्यांवरील नियंत्रण अजूनही सैल

नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी कारागृहात महत्प्रयत्नांनंतर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी कॅमेऱ्याचा तिसरा डोळा असतानाही कारागृहातील गैरप्रकार थांबले नसल्याने अद्याप सीसीटीव्हीची संपूर्ण यंत्रणा कारागृह प्रशासनाच्या हाती आली नसल्याचे समजते. कैद्यांच्या गुन्हेगारी घटनांमुळे नाशिकरोड कारागृह नेहमीच चर्चेत राहिले आहे. टोळीयुद्धाबरोबरच कारागृहातील बॅरेकमध्ये गुन्हेगारी स्वरूपाच्या गंभीर घटना घडत असूनही यावर आळा बसविण्यास कारागृह प्रशासनाला यश आलेले नाही.कारागृहात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असल्याचा दावा प्रशासन करीत असतानाही कारागृहात भ्रमणध्वनी आणि अमली पदार्थ शोध मोहीम राबवावी लागत असेल तर येथील तिसरा डोळा निष्क्रिय असल्याचेच म्हणावे लागेल. यामुळेच कैद्यांचे भ्रमणध्वनीचे जाळे, कारागृहातून हलविली जाणारी सूत्रे, दोन गटांमधील हाणामाऱ्या, तसेच अमली पदार्थांचा सर्रास वापर होत असतानाही यात सीसीटीव्हीची भूमिका समोर येत नाही. वास्तविक या घटनांना आळा बसावा, यासाठीच सुमारे दोन वर्षांपूर्वी कारागृहावर सीसीटीव्हीची नजर ठेवण्याची घोषणा कारागृह महानिरीक्षकांनी केली होती. नाशिकरोड कारागृहाला भेट दिल्यानंतर सीसीटीव्ही यंत्रणा आणि कारागृहातील संरक्षण भिंंत अधिक उंच करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. मात्र या उपायांचा कोणताही लाभ कारागृहाला झालेला दिसत नाही. कारागृहातील ५२ ठिकाणांहून ६८ सीसीटीव्ही कॅमेरे कैद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवतील, अशी तरतूद करण्यात आली होती. प्रारंभी कॅमेरे कार्यान्वित करण्याच्या दराबाबत कंत्राटदारांनी नाराजी व्यक्त करीत या निविदेकडे पाठ फिरविली होती. मध्ये बरेच महिने गेल्यानंतर काही महिन्यांनी एजन्सीकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर कारागृहात सीसीटीव्ही लावण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातदेखील सुमारे १२ सीसीटीव्ही कॅमेरे आणखी मंजूर करण्यात आले. त्यामुळे कारागृह सीसीटीव्हीच्या कक्षेत आल्याने सुरक्षिता वाढेल, असे वाटत असताना कैद्यांच्या कारवाया अजूनही सुरूच असताना सीसीटीव्हीची मदत का घेतली जात नाही, असा सवाल निर्माण झाला होता. प्रत्यक्षात ही यंत्रणा सक्षमपणे कार्यान्वित झाली नसून अद्यापही काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची प्रतीक्षा असल्याचे समजते. कारागृहाकडे संपूर्ण नियंत्रण कक्षाचे नियंत्रण राहणार आहे. मात्र अजूनही संंबंधिक कंत्राटदाराकडून संपूर्ण यंत्रणा कारागृह महानिरीक्षकांच्या ताब्यात दिली नसल्याचे कळते. (प्रतिनिधी)