शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या दिवशीही गर्दीच

By admin | Updated: November 12, 2016 21:58 IST

मालेगाव : पैसे न मिळाल्याच्या धसक्याने इसमाचा मृत्यू

मालेगाव / आझादनगर : पाचशे व हजार रूपयांच्या नोटा बदलण्यासाठी आज शनिवारी सलग तिसऱ्या दिवशी विविध बँक शाखांबाहेर व एटीएम केंद्रांवर उच्चांकी गर्दी होती. शुक्रवारी दिवसभर रांगेत उभे राहूनही पैसे न मिळाल्यामुळे शहरातील मिरादातारनगर भागात राहत असलेल्या इसमाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तर शुक्रवारी रात्री शहरात मीठ व साखरेचे दर वाढल्याची अफवा सोशल मीडियावरून पसरल्याने नागरिकांनी किराणा दुकानांमध्ये साखर व मीठ खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. जमावाला हटविण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिस व सामाजिक कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले होते.गेल्या मंगळवारपासून शहरातील व्यवहार चलनाअभावी ठप्प झाले आहेत. शहरातील सर्वच बँकांबाहेर पैसे काढण्यासाठी विक्रमी गर्दी होत आहे. तब्बल अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत नागरिक रांगा लावत आहेत. शुक्रवारी आठवडे बाजार व यंत्रमाग व्यवसायाला सुट्टी असल्यामुळे सुमारे ७० ते ८० कोटी रूपयांची नोटांची अदलाबदल करण्यात आली. शुक्रवारी दिवसभर पैसे काढण्यासाठी येथील बँक आॅफ महाराष्ट्राच्या शाखेबाहेर रांगेत उभे राहूनही शेख अलाउद्दीन शेख शहाबुद्दीन (५२) रा. मिरादातारनगर या यंत्रमाग कामगाराला पैसे मिळाले नाहीत. याचा धसका घेतल्याने त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. तर शुक्रवारी रात्री शहरात मीठाचे व साखरेचे दर वाढल्याची अफवा सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी किराणा दुकानांमध्ये मीठ व साखर खरेदीसाठी झुंबड केली होती तर या अफवेचे सोने करण्याची संधी साधत काही दुकानदारांनी चढ्या दराने मीठ व साखरेची विक्री करत सर्वसामान्यांची आर्थिक लुट केली. पोलीसांनी शहरात गस्त वाढविली होती तसेच पोलीस वाहनांद्वारे ध्वनीक्षेपकाद्वारे अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन केले. मीठ व साखरेचे दर बाजार भावा प्रमाणेच असल्याचे सांगितल्यानंतर नागरिकांनी किराणा दुकानांजवळ गर्दी केली होती. यामुळे काही ठिकाणी पोलिसांनी सौम्य लाठीमार व बळाचा वापर करीत गर्दीला हटवले होते. शहरालगतच्या टेहरेशिवारात किराणा मार्केट आवारातून मीठाच्या गोण्या चोरीला गेल्याचे प्रकारही झाला. शनिवारचा दिवस उजाडल्यानंतर विविध बँकांच्या शाखांबाहेर गर्दीचा विक्रम कायम होता. सकाळपासूनच नागरिकांनी नोटा बदलण्यासाठी गर्दी केली होती. येथील मुख्य पोस्ट कार्यालयात शनिवारी दिवसभर एक कोटी रूपयांचे वाटप करण्यात आले. प्रत्येकी चार हजार रूपये देण्यात येत होते. पोस्ट प्रशासनाकडून रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना पाणी व चॉकलेटचे वाटप केले जात होते. एकाच ओळखपत्रावर वारंवार नोटा बदलणाऱ्यांची संख्या अधिक दिसून आली. यामुळे गर्दी ओसरत नव्हती. उद्या रविवारीही पोस्ट कार्यालयात नोटा बदलून देणार असल्याची माहिती आर. एन. मोरे यांनी दिली.(वार्ताहर)