शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

बॅँक समजून इतर कार्यालयांचीच नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 22:48 IST

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे रात्री बॅँक आॅफ महाराष्ट्र समजून चोरट्यांनी ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय व पोस्ट आॅफिस या तिन्ही कार्यालयांचे कुलूप तोडून कार्यालयातील कपाटाचे दरवाजे वाकवून कागदपत्रांची नासधूस केल्याची घटना घडली. तसेच गावातील साईनाथ नारायण सोनवणे यांच्या मोटरसायकलची तोडफोड केली.

ठळक मुद्देराजापूर : दुष्काळानंतर आता चोरट्यांनी हैराण

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथे रात्री बॅँक आॅफ महाराष्ट्र समजून चोरट्यांनी ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय व पोस्ट आॅफिस या तिन्ही कार्यालयांचे कुलूप तोडून कार्यालयातील कपाटाचे दरवाजे वाकवून कागदपत्रांची नासधूस केल्याची घटना घडली. तसेच गावातील साईनाथ नारायण सोनवणे यांच्या मोटरसायकलची तोडफोड केली.येथील ग्रामपंचायत कार्यालयाला दर्शनी भागात बँक आॅफ महाराष्ट्र नावाचा मोठा बोर्ड लावलेला आहे. तेथे बँक आॅफ महाराष्ट्रचे एटीएम मशीन आहे. राजापूर येथे मागे काही दिवसांपूर्वीच धनराज नाना वाघ व अशोक रखमा वाघ या दोघा शेतकऱ्यांच्या नवीन मोटारसायकल घरासमोरून चोरीला गेल्या आहे.महिन्यापूर्वीच गणाधीश इंटरनॅशनल स्कूलच्या संचालकाच्या निवासस्थानाचे कुलूप तोडले होते. अशा घटना राजापूर येथे नेहमी घडतात. तलाठी कार्यलयातील कपाटाचा दरवाजा वाकवून कागदपत्राची नासधूस केली. घटनास्थळी सपोनि देवीदास पाटील, पोलीस हवालदार सुरासे, ज्ञानेश्वर हेंबाडे यांनी पंचनामा केला व येवला पंचायत समिती गटविकासधिकारी शेख, विस्तार अधिकारी यादव यांनी घटनास्थळाची पहाणी केली. यावेळी राजापूर येथे पोलीस चौकी व्हावी अशी मागणी लक्ष्मण घुगे, भारत वाघ यांनी केली आहे. ग्रामसुरक्षा दल स्थापन करावे, असे पाटील यांनी यावेळी सांगितले. या चोºयांमुळे राजापूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण असून, राजापूर व परिसरात सध्या दुष्काळामुळे जनता हैराण झाली आहे. त्यात चोºया सुरू झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.चोरट्यांनी येवला - नांदगाव रोडवर पंपाजवळ दादा विंचू यांच्या बंगल्याला असलेची तार कंपाऊड तोडून चोरटे आत गेले. तेथे वयोवृद्ध माणसे असल्याने चोरट्यांनी त्याच्याकडे पिण्यासाठी पाणी द्या व पेट्रोल घेण्यासाठी रिकामी पाण्याची बाटली मागितली व चोरटे निघून गेले व त्यांनी बॅँक समजून तिन्ही कार्यलायाचे कुलूप तोडले. मात्र त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले.