लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : तिडके कॉलनी परिसरातील जनकल्याण बँकेच्या शाखेतील सीसीटीव्ही कॅमेºयांचे नुकसान करून चोरट्यांनी बँकेतील डिव्हीआर बॉक्स चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि़५) रात्रीच्या सुमारास घडली़राणेनगर येथील रहिवासी फरजाना मुस्ताक कोतवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी रात्री चोरट्यांनी बँकेच्या वरच्या मजल्यावरील खिडकी तोडून बँकेत प्रवेश केला. मात्र चोरट्यांना बँकेत काही न सापडल्याने त्यांनी सीसीटीव्ही कॅमेºयांचे नुकसान करून सीसीटीव्ही कॅमेºयांचा दहा हजार रुपये किमतीचा डीव्हीआर बॉक्स चोरून नेला.याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
तिडके कॉलनीतील जनकल्याण बँकेत चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 22:48 IST