शहरं
Join us  
Trending Stories
1
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
2
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
3
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
4
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
5
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
6
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
7
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
8
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
9
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
10
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
11
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
12
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
13
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
14
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
15
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
16
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
17
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
18
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
19
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
20
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक

पाथरे परिसरात भुरट्या चोरांचा धुमाकूळ

By admin | Updated: February 21, 2016 22:01 IST

पाथरे परिसरात भुरट्या चोरांचा धुमाकूळ

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे खुर्द परिसरात भुरट्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे. या चोरट्यांचा पोलिसांनी तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. पाथरे खुर्द शिवारातून गोदावरी डावा कालवा जातो. या भागातील जमीन बागायती असल्याने शेतात वस्ती करून राहणाऱ्यांची संख्या येथे मोठी आहे. दत्तात्रय कचरू चिने, संपत रंगनाथ आभाळे यांच्या शेतातून पीव्हीसी पाइप, जलवाहिनीचे बारे, विद्युतपंप, फ्यूज, केबल, स्टार्टर, पाणी फिल्टर आदि महागड्या वस्तू चोरीस गेल्या आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन चोरटे आपला कार्यभाग साधत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दिवसभर शेतात कष्ट केल्यानंतर पुन्हा रात्रभर जागरण करून चोऱ्या टाळण्यासाठी पहारा देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पिकांना पाणी देण्याच्या वस्तूंनाच चोरटे आपले लक्ष्य बनवत असल्याने शेतमालाचे नुकसान होत आहे. रात्री शेतीला पाणीपुरवठा करण्याच्या वेळीच चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. जास्तीच्या भारनियमनामुळे शेतकरी अधिकच चिंताग्रस्त झाला आहे. रात्री उशिरा वीजपुरवठा चालू झाल्यावर शेतीला पाणी द्यावे लागत आहे. अशातच साहित्याची चोरी होत असल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. भुरट्या चोरांच्या दहशतीमुळे कालव्याच्या आवर्तनावरील शेतीही धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे. (वार्ताहर)