शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी २१ हजार अंडी लांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:16 IST

वावी येथील व्यावसायिक राजेंद्र लक्ष्मीनारायण भुतडा यांचे दुशिंगपूर शिवारात पोल्ट्रीचे तीन शेड आहेत. त्यापैकी एका पोल्ट्रीच्या गोडाउनची लोखंडी ...

वावी येथील व्यावसायिक राजेंद्र लक्ष्मीनारायण भुतडा यांचे दुशिंगपूर शिवारात पोल्ट्रीचे तीन शेड आहेत. त्यापैकी एका पोल्ट्रीच्या गोडाउनची लोखंडी जाळी चोरट्यांनी कापली. या शेडमध्ये अंडी भरलेले ७०० ट्रे चोरट्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या वाहनात भरून नेले. रात्री १२ वाजेपर्यंत पोल्ट्री शेडवरील कामगार पोल्ट्रीत होते. रात्री ते झोपण्यासाठी गेल्यानंतर चोरट्यांनी शेडवर येऊन अंड्यांचे ट्रे चोरून नेले. पोल्ट्री शेडचा सुपरवायझर सकाळी उठल्यानंतर त्याच्या दरवाजाची कडी बाहेरून लावलेली होती. त्याने फोन करून कामगारांना दाराची कडी उघडण्यास लावली. त्यानंतर सुपरवायझर आणि कामगार अंड्यांच्या गोडाउनकडे गेल्यानंतर त्यांना जाळी कापलेली आणि शेडमधील अंड्यांचे ट्रे नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी ओम पोल्ट्रीचे मालक राजेंद्र भुतडा यांना घटनेची माहिती दिली.

इन्फो

चोरट्यांचा ‘अंडे का फंडा’

भुतडा यांचे तीन मोठे पोल्ट्री शेड असून, एका शेडमध्ये साडेआठ हजार, तर उर्वरित दोन शेडमध्ये साडेसात व पाच हजार कोंबड्या आहेत. त्यामुळे दररोज हजारो अंडी मिळतात. सदर अंडी ट्रेमध्ये भरल्यानंतर ते व्यापाऱ्यांच्या गाड्या आल्यानंतर पुणे, निफाड, विंचूर व कोपरगाव या परिसरात पाठवले जातात. मात्र चोरट्यांनी या २१ हजार अंड्यांवर डल्ला मारल्याने भुतडा यांचे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यात घोटेवाडी रस्त्याला नवनाथ यादव यांच्या पोल्ट्री शेडमधूनही अज्ञात चोरट्यांनी अंड्यांचे ट्रे चोरून नेल्याची घटना घडली होती. चोरट्यांचा हा अंडे का फंडा मात्र पोल्ट्री व्यावसायिकांच्या चिंता वाढवत आहे.

फोटो - ०९ एग्ज थेफ्ट

सिन्नर तालुक्यातील दुशिंगपूर येथील पोल्ट्री शेडची जाळी कापून चोरट्यांनी अंड्यांनी भरलेले ट्रे लांबवले.

===Photopath===

090321\09nsk_53_09032021_13.jpg

===Caption===

फोटो - ०९ एग्ज थेफ्ट  सिन्नर तालुक्यातील दुशिंगपूर येथील पोल्ट्री शेडची जाळी कापून  चोरट्यांनी अंड्यांनी भरलेले ट्रे लांबवले.