शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

सौभाग्यलेण्यावर चोरट्यांचा डोळा

By admin | Updated: April 24, 2016 23:57 IST

कोट्यवधींची लूट : गुन्हे उघडकीस येण्याचे अत्यल्प प्रमाण, महिलांमध्ये असुरक्षितता

नाशिक : शहरातील सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटना रोखण्याबरोबरच चोरट्यांचा शोध घेणे शहर पोलिसांसाठी आव्हान असून, गेल्या सव्वापाच वर्षात विचार करता सोनसाखळी चोरीच्या ७०७ घटनांपैकी अवघ्या २२४ घटनांचाच पोलिसांना यशस्वी तपास केला आहे़ सोनसाखळी चोरीच्या घटना व यशस्वी तपासामधील तफावत पाहता पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत शंका उपस्थित केली जाते आहे़ दरम्यान, शहरातील वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे महिलांमध्ये घबराट पसरली आहे़शहरातील इंदिरानगर, गंगापूर, उपनगर, पंचवटी, नाशिकरोड या पोलीस ठाणे हद्दीत सकाळी - सायंकाळी फिरण्यासाठी जाणाऱ्या महिला या सोनसाखळी चोरट्यांच्या रडारवर असतात़ धूम स्टाइलने दुचाकीवर येऊन पाठीमागून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचायचे तर कधी पत्ता विचारण्याच्या बहाणा करायच्या क्लृप्त्या या चोरट्यांकडून वापरल्या जातात़ विशेष म्हणजे काम फत्ते झाल्यानंतर चोरटे क्षणार्धात पलायन करतात अन् पोलिसांच्या नाकाबंदीतही हाती लागत नाहीत़सद्यस्थितीत लग्नसराईचे दिवस असल्याने तसेच मुलांना सुटी असल्याने महिला खरेदीसाठी बाहेर पडतात़ दुचाकीवरून येऊन रस्त्यावरून जाणाऱ्या महिला वा वृद्धांच्या गळ्यातील मंगळसूत्र किंवा सोनसाखळी चोरटे खेचून नेतात़ सोनसाखळी खेचल्यानंतर चोरट्यांना पळ काढण्यात यश येत असल्याने पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे दिसून येते़ शहरात सोनसाखळीची घटना घडत नाही, असा एखादाच दिवस जातो़ विशेष म्हणजे या सोनसाखळी चोरट्यांना आवर घालण्यास पोलीस अपयशी ठरत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते़ सोनसाखळी चोरीतील कमी धोका, कमी श्रम, गुन्हे करण्यास सोपे, पकडले जाण्याची शक्यता कमी, चोरीच्या मालाची विल्हेवाट लावणे सोपे. यामुळे चोरट्यांची हिंमत वाढली असून, या घटनांमध्येही वाढ झाली आहे़ (प्रतिनिधी)