शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांकडून चोरटे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:10 IST

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यात वाहन चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून पिंपळगाव ...

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यात वाहन चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून पिंपळगाव बसवंत पोलिसांनी चोरट्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करत वाहन चोरांना गजाआड करण्यात यश आले आहे. सदर आरोपी येवला येथे सध्या राहत असून ते हरियाणा व राजस्थान येथील मूळ रहिवाशी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळगाव बसवंत येथील चिंचखेड रोड येथे राहणाऱ्या दिलीप नथू पाटील संधान यांची सफेद रंगाची महिंद्रा पिकअप बोलेरो एम एच १५ सी के .९९४७ गुरुवार दि.३ जून रोजी चोरी झाल्याची तक्रार पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात दाखल झाली होती .त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल नितीन जाधव, मिथुन घोडके,पोलीस शिपाई संदीप दराडे,योगेश धोंगडे यांनी कसून तपास करण्यास सुरुवात केली. एका गुप्त माहितीदाराने पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांना पिकअप घेऊन जात असल्याची माहिती दिली. तत्काळ पोलीस कर्मचारी नितीन जाधव ,मिथुन घोडके,संदीप दराडे,योगेश धोंगडे यांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी धाव घेतली. पोलिसांना बघताच चोरटे पिकअप घेऊन पळून जाऊ लागले. तेव्हा सिनेस्टाईलने पाठलाग करत अखेर पोलिसांनी अथक प्रयत्नाने चोरट्यांना ताब्यात घेतले व गजाआड केले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे चोरीला गेलेली वाहने लवकरात लवकर सापडतील व चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या जातील असे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. (२९ पिंपळगाव १)

-------------------

एका गुप्त माहितीदाराकडून पिकअप घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यावर तातडीने त्याचा सिनेस्टाईलने पाठलाग करत त्या चोरट्यांना ताब्यात घेतले. वाहनधारकांनी सतर्क राहून आपले वाहन पार्क करावे तसेच कोणावर संशय आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.

- भाऊसाहेब पटारे, पोलीस निरीक्षक, पिंपळगाव बसवंत

===Photopath===

290621\29nsk_14_29062021_13.jpg

===Caption===

२९ पिंपळगाव १