शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांच्या टोळीस अटक

By admin | Updated: June 25, 2017 00:25 IST

नाशिक : सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गस्तीपथकाने आठ जणांच्या चोरट्यांच्या टोळीस पकडले असून, त्यांच्याकडून शस्त्रास्त्रांसह अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गस्तीपथकाने आठ जणांच्या चोरट्यांच्या टोळीस पकडले असून, त्यांच्याकडून शस्त्रास्त्रांसह अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये मोबाइल, दुचाकी व शस्त्रास्त्रांचाही समावेश आहे़ विशेष म्हणजे या आठ जणांच्या टोळीमध्ये चार अल्पवयीन बालकांचाही समावेश असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली.  सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या सहायक निरीक्षक सारिका अहिरराव व पथकातील कर्मचाऱ्यांना या टोळीबाबत माहिती मिळाली होती़ त्यानुसार विसे मळा परिसरातील गस्तीमध्ये दोन जणांच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या़ या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून आठ जणांच्या चोरट्यांच्या टोळीचा उलगडा झाला़ पोलिसांनी संशयित पंकज नरेंद्र टोंगारे (२१, रा. पंचवटी), प्रतीक गणेश धात्रक (२१, रा. रविवार पेठ), जितेंद्र रवींद्र शेटे (२०, रा. घासबाजार) व रवि अण्णा उगले (२२, पंचवटी) या चौघांना अटक केली असून, चार अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी या आठही संशयितांची झडती घेऊन सखोल चौकशी केल्यानंतर ते शस्त्राचा धाक दाखवून लूटमार व चोऱ्या करीत असल्याचे समोर आले. पोलिसांनी या आठ जणांच्या घरी झडती घेतली असता चोरीचे १४ मोबाइल, चार दुचाकी, सात कोयते, चॉपर व चाकू असा सुमारे दोन लाख ४५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला़ सहायक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ, डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सारिका अहिरराव, भालेराव आदींनी ही कारवाई केली़