शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

भाषा येत नसल्याचा फायदा घेत घर विकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 00:23 IST

नाशिक : मूळ कोलकाता येथील निवासी असलेल्या महिलेला मराठी भाषा येत नसल्याचा फायदा घेत काही संशयितांनी त्यांच्या भारतनगर परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी तर केलीच; मात्र त्यांच्या घराची परस्पर विक्रीदेखील केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भामट्यांनी तब्बल १ लाख ९० हजारांचा ऐवज लुटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

ठळक मुद्देसंशयितांनी घरफोडी केली

नाशिक : मूळ कोलकाता येथील निवासी असलेल्या महिलेला मराठी भाषा येत नसल्याचा फायदा घेत काही संशयितांनी त्यांच्या भारतनगर परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी तर केलीच; मात्र त्यांच्या घराची परस्पर विक्रीदेखील केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भामट्यांनी तब्बल १ लाख ९० हजारांचा ऐवज लुटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.जरीना बेगम मोहंमद अलीम अन्सारी (५६, रा. भारतनगर, वडाळारोड, मूळ कोलकाता- १७) यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार कथन करत संशयितांविरुद्ध फिर्याद दिली आहे. अन्सारी यांची भारतनगर येथे त्यांच्या मिळकतीच्या घरात काही कालावधीसाठी येथे राहत असताना संशयित दिगंबर भागूजी आव्हाड व त्याच्या इतर साथीदारांनी संगनमत करून त्यांना मराठी येत नसल्याचा फायदा घेत ४ मे २०१८ ते ९ आॅक्टोबर २०१८ या कालावधीत त्यांची मिळकत भाडेतत्त्वावर घेत आहेत, असा बनाव केला. यानंतर त्यांची मिळकत गिळंकृत करण्यासाठी त्यांच्या दोन स्टॅम्पपेपरवर स्वाक्षऱ्या घेतल्या. त्यानंतर त्यांची मिळकत नावे करवून घेत ही मिळकत अजिजा खान नावाच्या महिलेला परस्पर विक्र ी करून फसवणूक केली.दरम्यान, अन्सारी या कामानिमित्त भारतनगर येथील घराला कुलूप लावून कोलकाता येथे गेल्याचा फायदा घेत संशयितांनी घरफोडी केली. त्यांच्या घरातील डिनर सेटपासून दागिन्यांपर्यंत तब्बल १ लाख ९० हजारांचा ऐवज लुटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.