शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ घंटागाडी ठेकेदार काळ्या यादीत?

By admin | Updated: December 17, 2015 00:22 IST

कारवाईचे संकेत : प्रशासनाचे कठोर पाऊल

नाशिक : घंटागाडी कामगारांना सुधारित किमान वेतन नाकारणाऱ्या घंटागाडी ठेकेदारांना महापालिका प्रशासनाने आता काळ्या यादीत टाकण्याचे संकेत दिले असून सदर ठेकेदारांना यापुढील कोणत्याही कामाच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यास मनाई केली जाणार आहे. ठेकेदारांकडून टाळाटाळ होत असल्यानेच प्रशासनाने त्याविरोधात कठोर पाऊल उचलण्याचे ठरविले आहे.२४ फेब्रुवारी २०१५ च्या अधिसूचनेनुसार घंटागाडी कामगारांना सुधारित किमान वेतन मिळावे यासाठी गेल्या तीन-चार महिन्यांपासून घंटागाडी कामगार आंदोलने करत आहेत. परंतु महापालिकेकडून वारंवार आदेश देऊनही घंटागाडी ठेकेदारांकडून वेतन अदा करण्यास टाळाटाळ केली जात आहे. याउलट ठेकेदारांनी उच्च न्यायालयात महापालिका व कामगार उपआयुक्त कार्यालयाच्या आदेशाला आव्हान दिलेले आहे. सदर अध्यादेश घंटागाडी ठेकेदारांसाठी लागूच होत नसल्याचा दावा ठेकेदारांकडून केला जात आहे. दरम्यान, कामगार उपआयुक्त कार्यालयाने महापालिकेला खरमरीत पत्र देऊन संबंधित ठेकेदारांविरुद्ध कठोर पाऊले उचलण्याचे कळविले होते. त्यानुसार, प्रशासनाने घंटागाडी ठेकेदारांना तीन दिवसांची मुदत देत किमान वेतन अदा करण्याचे आदेश काढले. वेतन अदा न केल्यास घंटागाडी ठेकेदारांच्या देय रकमेतून वेतन देण्याचाही पवित्रा प्रशासनाने घेतला होता. दरम्यान, संबंधित घंटागाडी ठेकेदारांची मुदत ७ डिसेंबरला संपली असली तरी त्यांना मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत पुन्हा एक महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आता संबंधित ठेकेदारांना कोंडीत पकडण्याचे ठरविले असून त्यांनी वेतन अदा न केल्यास काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाही सुरू केली असल्याचे समजते. (प्रतिनिधी)