शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील दोन लाख ९९ हजार ४४४ अतिक्रमणे होणार कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 17:39 IST

मालेगाव : राज्यातील गावठाणवरील व महापालिका क्षेत्रातील गावठाण गायराण जमिनीवरील निवासी घरांचे अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात येत आहेत.

मालेगाव : राज्यातील गावठाणवरील व महापालिका क्षेत्रातील गावठाण गायराण जमिनीवरील निवासी घरांचे अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात येत आहेत. राज्यभरातील दोन लाख ९९ हजार ४४४ अतिक्रमणे कायम होणार आहेत. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मालेगाव तालुक्यातील पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात अतिक्रमणे नियमानुकूल प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे उपस्थित होते.मालेगाव तालुक्यातील अतिक्रमणे कायम करण्यासाठी २००४ पासून कागदोपत्री प्रक्रिया सुरू होती. केंद्र व राज्य शासनाने २०२२ पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे देण्याचा निर्णय घेतला आहे. या धोरणाचे प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागातील शासकीय जमिनींवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याबाबत ग्रामविकास विभागाने १६ फेब्रुवारी २०१८ ला निर्णय घेतला होता. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्यातील ग्रामीण भागातील ३४ जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील एकूण चार लाख ७३ हजार २४८ अतिक्रमणांची नोंदी संगणकावर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी २ लाख ९९ हजार ४४४ अतिक्रमणे १ जानेवारी २०११ पूर्वीची आहेत. ९९ हजार ६१५ अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची कारवाई ग्रामसभेत करून गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रमाणित केल्यानंतर ही अतिक्रमणे नियमनुकूल करण्यात आली आहेत.

टॅग्स :Governmentसरकार