शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

देशी पिस्तूल अन‌् कट्टे बाळगण्याची ‘क्रेझ’ भोवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:13 IST

शहरात चालू वर्षी अवैधरीत्या अग्निशस्त्रांसह कोयते, तलवारी, चॉपरसारखे घातक शस्त्रे विनापरवाना बाळगणे, तसेच काडतुसांची तस्करी करणाऱ्या टोळीकडून संबंधितांना पुरवठा ...

शहरात चालू वर्षी अवैधरीत्या अग्निशस्त्रांसह कोयते, तलवारी, चॉपरसारखे घातक शस्त्रे विनापरवाना बाळगणे, तसेच काडतुसांची तस्करी करणाऱ्या टोळीकडून संबंधितांना पुरवठा केला जात असल्याचेही अनेकदा समोर आले आहे. पोलिसांच्या कारवाईमध्ये घातक धारदार शस्त्रे जप्त करण्याचे प्रमाण तिप्पट झाले आहे. शहरात अवैधरीत्या अग्निशस्त्रांचा पुरवठा मध्य प्रदेश राज्यातील विविध शहरांमधून तर तलवारींचा पुरवठा राजस्थानमधून होत असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. मध्य प्रदेश, गुजरात या दोन राज्यांच्या सीमा जिल्ह्याला लागून असल्यामुळे दिवसेंदिवस गुन्हेगारांकडून तस्करी वाढू लागली आहे. सराईत गुन्हेगारांना अत्यंत कमीतकमी किमतीत ही शस्त्रे उपलब्ध होत असल्याने त्यांचा वापर वाढत चालला आहे. गुन्हेगारांमधील आपापसात वादात वा सर्वसामान्यांमध्ये धाक निर्माण करत लूट करण्यासाठी शस्त्रांचा वापर होऊ लागल्याचे विविध घटनांमधून दिसून आले आहे. नाशकात मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या गावठी कट्टे, पिस्तुली, काडतुसांचा अवैध व्यापाराची पाळेमुळे घट्ट होऊ पाहत असून, शहर व जिल्हा पोलिसांपुढे नव्या वर्षात ही पाळेमुळे उखडून फेकण्याचे आव्हान राहणार आहे.

--इन्फो--

हत्यारे बाळगण्याचे प्रमाण तिप्पट

मागील वर्षभरात शहर पोलिसांनी केलेल्या विविध कारवायांमध्ये गावठी कट्टे आणि पिस्तुली बाळगल्याप्रकरणी २१ \गुन्हे दाखल करण्यात आले होते. चालू वर्षभरात मात्र पोलिसांनी धारदार कोयते, चाकू, तलवारी अशी शस्त्रे बाळगल्याप्रकरणी २३ \गुन्हे दाखल दाखल केले. या वर्षी अग्निशस्त्रे बाळगल्याप्रकरणी अंबड, पंचवटी पोलीस ठाण्यात जास्त \गुन्हे दाखल झाले होते.

--इन्फो--

अवैध शस्त्रे बाळगणारे पाण्डेय यांच्या ‘टार्गेट’वर

पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी अवैधरीत्या शस्त्रे स्वत:जवळ बाळगणाऱ्यांविरुद्ध ‘कोम्बिंग ऑपरेशन’ची मोहीम उघडल्यामुळे गुन्हेगारांमध्ये काहीसा वचक निर्माण झाला आहे. आतापर्यंत त्यांच्या आदेशान्वये शहरात सुमारे तीनदा अशी धडक मोहीम राबविली गेली आहे. यामुळे यंदा अवैध अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी २२, तर धारदार हत्यारे बाळगल्याप्रकरणी तब्बल ८७ गुन्हे दाखल झालेत आणि तेवढेच शस्त्रे जप्त करण्यात आली.

---इन्फो--

पोलीस ठाणेनिहाय जप्त करण्यात आलेली अग्निशस्त्रे

आडगाव-२, पंचवटी- ६, म्हसरुळ-२, भद्रकाली-२, सरकारवाडा-१, इंदिरानगर-१, उपनगर-३, नाशिक रोड-४

--