शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत पुन्हा टोळीयुद्ध पेटले

By admin | Updated: June 29, 2014 00:05 IST

पंचवटीत पुन्हा टोळीयुद्ध पेटले

 

पंचवटी : परिसरात गेल्या महिनाभरापासून गुंडप्रवृत्तीच्या टोळक्याने दहशत माजविण्यास सुरुवात केली असून, यात तडीपार गुंडांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. विविध गुन्हे असल्याच्या कारणावरून पोलिसांनी तडीपार केलेले गुंड सर्रासपणे पुन्हा आपापल्या परिसरात खुलेआम वावरत असले तरी पोलीस प्रशासन त्याबाबत अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पंचवटी परिसरात गेल्या महिनाभरात जवळपास चार ते पाच मारहाणीच्या तसेच शस्त्राने वार केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या घटनेत तडीपार गुंडांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. विविध गुन्ह्यांत तडीपार केलेले गुंड पोलिसांची नजर चुकवून पुन्हा परिसरात खुलेआम वास्तव्य करीत असले तरी पोलिसांना त्याचा थांगपत्ता लागत नाही. कोम्बिंग आॅपरेशन, आॅल आउट, गुन्हेगार तपासणी यांसारख्या मोहिमा पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार संपूर्ण शहरात राबविल्या जात असल्या तरी या मोहिमेतून गुन्हेगार हाती सापडत नसल्याने पोलीस प्रशासनाचे उपक्रम केवळ नावापुरतेच उरले असल्याची चर्चा आता नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. गेल्या महिनाभरात पंचवटी परिसरात घडलेल्या घटना टोळी युद्धातून झाल्या असून, यापूर्वी त्यातूनच प्राणघातक हल्ला, खुनाच्या घटना घडलेल्या होत्या. गुन्हेगारी प्रवृत्तीशी संबंधित असलेल्या गुन्हेगारी टोळक्याने पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केल्याने आगामी कालावधीत या टोळक्यांकडून गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडण्याची दाट शक्यता आहे. पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या काही घटनांतील संशयितांना पोलिसांनी जेरबंद केले असले तरी या तडीपार गुंडांसह टवाळखोरी करणाऱ्यांच्या मुसक्या वेळीच आवळणे गरजेचे झाले आहे. गुन्हा शोध पथकातील कर्मचारी गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अपयशी ठरत असून, पोलीस व गुन्हेगार यांच्यातील लागेबांधे यांचीही उघडपणे चर्चा होऊ लागली आहे. (वार्ताहर)