शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बाधित आढळण्याच्या प्रमाणात झाली घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 00:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : महापालिकेने भारतीय जैन संघटनेच्या मदतीने सुरू केलेल्या कोरोना चाचण्यांचा अनुकूल परिणाम दिसून येत आहे. गेल्या २८ दिवसांत ३८ हजारांहून अधिक अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून  ५ हजार ५५ बाधित आढळले आहेत. अर्थात, कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण १३ टक्के आहे तर निगेटिव्हचे प्रमाण ८७ टक्के आहे.

ठळक मुद्देशहरात गेल्या २८ दिवसात ३८ हजार ७११ चाचण्या

नाशिक : महापालिकेने भारतीय जैन संघटनेच्या मदतीने सुरू केलेल्या कोरोना चाचण्यांचा अनुकूल परिणाम दिसून येत आहे. गेल्या २८ दिवसांत ३८ हजारांहून अधिक अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्या माध्यमातून  ५ हजार ५५ बाधित आढळले आहेत. अर्थात, कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण १३ टक्के आहे तर निगेटिव्हचे प्रमाण ८७ टक्के आहे.दरम्यान, गेल्या चोवीस तासात ६२९ रुग्ण आढळले आहेत, तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दाट लोकवस्ती आणि अन्यत्रही असलेल्या बाधितांना हुडकून काढण्यासाठी ही मोहीम राबविली जात आहे.त्याअंतर्गत २२ मोबाइल व्हॅन यानिमित्ताने शहरातील प्रतिबंधित तसेच दाट वस्तीच्या भागात फिरतात आणि आरोग्य तपासणी करून रुग्ण शोधण्याचे काम करीत असतात.इतकेच नव्हे तर रुग्णांना काढा आणि प्रतिकारशक्ती वाढविणारी अन्य औषधेही दिली जातात. शहरात गेल्या २८ दिवसात ३८ हजार ७११ चाचण्या घेण्यात आले असून, पाच हजार ५५ रुग्ण आढळले आहेत.त्यामुळे ३३ हजाराहून अधिक नागरिकांना दिलासा देण्यातयश आले आहे.दरम्यान, चोवीस तासात६२९ रुग्ण आढळले आहे.तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सिडकोतील कामटवाडे शिवारातील ६५ वर्षीय वृद्ध आणि नाशिकरोड येथील एका ३५ वर्षाच्या रुग्णाचा समावेश आहे. शनिवारी (दि.२२) ६२९ रुग्ण आढळले. आत्तापर्यंत आढळलेल्या एकूण बाधितांची संख्या १९ हजार ७१२ बाधित झाली आहे, तर १६ हजार ५५५रूग्ण बरे झाले आहेत. सध्या २ हजार ६३१ रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण १३ टक्के निगेटिव्हचे प्रमाण ८७ टक्के.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याhospitalहॉस्पिटल