नाशिक : गंगापूर धरणातील पंपिंग स्टेशन येथे वाढीव क्षमतेचा ट्रान्सफार्मर बसविणे आणि शहरातील वितरण वाहिन्यांची दुरुस्ती करणे यासाठी येत्या बुधवारी (दि.७) वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. परिणामी, बुधवारी शहराचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नसल्याचे मनपाच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांनी कळविले आहे.गंगापूर धरणातील पंपिंग स्टेशनमध्ये वाढीव क्षमतेचा ट्रान्सफार्मर बसविणे तसेच वितरण वाहिन्यांची दुरुस्ती करणे आदि कामे करून घेण्यासाठी बुधवारी वीजपुरवठा सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे गंगापूर धरणातील पंपिंग स्टेशन येथून शहराला पाणीपुरवठा होणार नाही. परिणामी, बुधवारी संपूर्ण शहराचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नसून गुरुवारी (दि. ८) पाणीपुरवठा कमी दाबाने व कमी प्रमाणात होणार आहे. बुधवारी रात्रीपर्यंत काम पूर्ण न झाल्यास गुरुवारी सकाळचाही पाणीपुरवठा होणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे. (प्रतिनिधी)
संपूर्ण शहरात उद्या सायंकाळी पाणी नाही
By admin | Updated: October 5, 2015 22:52 IST