शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

संभाजीनगर नामकरणास विरोध नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:12 IST

नाशिक : औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यास आमचा विरोध नाही; मात्र सध्या नामकरणाची आवश्यकता नाही. केवळ निवडणुका असल्याने नामांतराच्या ...

नाशिक : औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्यास आमचा विरोध नाही; मात्र सध्या नामकरणाची आवश्यकता नाही. केवळ निवडणुका असल्याने नामांतराच्या मुद्द्यावर राजकारण होत असल्याची टीका केंद्रीय मंत्री तथा आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केली आहे. यापूर्वी शिवसेना सत्तेत असताना नामकरण का केले नाही, असा सवाल करतानाच आता शिवसेनेने नामकरणाचा आग्रह केला तर काँग्रेस त्यांना सोडून जाईल, असे भाकीतही त्यांनी यावेळी केले.

नाशिकमधील शासकीय विश्रामगृहात रामदास आठवले यांनी शुक्रवारी (दि. ८) पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. ते म्हणाले, छत्रपती संभाजी राजे यांच्या नावाला आमचा विरोध नाही; मात्र तेथील विमानतळ‌ाला अजिंठा-वेरूळ असे नाव द्यावे, अशी मागणी करतानाच नामंतराच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि शिवसेनेतील ताणलेल्या संबंधाकडेही त्यांनी लक्ष वेधत राज्यातील सरकार आपसातील मतभेदांमुळे कोसळून पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, देशभरातील कोरोना स्थितीवर बोलताना कोरोनामुळे आर्थिक स्थिती खालावल्याचे मान्य करतानाच लसीकरणाचा खर्च राज्यांनी करावा असे मत त्यांनी व्यक्त केले.

इन्फो-१

निवडणुका भाजपसोबतच

राज्यभरात होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आरपीआय आणि भाजप एकत्र लढविणार असून नाशिकमध्येही भाजपसोबच राहणार असय्याचे रामदास आठवले यांनी स्पष्ट केेले. मात्र त्यासाठी आम्हाला आमच्या ताकदीप्रमाणे सन्मानजनक जागा मिळाव्यात अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

इन्फो-२

मराठा आरक्षणात सरकार अपयशी

मराठा आरक्षण प्रकरणात उद्धव ठाकरे यांचे सरकार न्यायालयात भक्कम बाजू मांडण्यात अपयशी ठरल्याची टीका रामदास आठवले यांनी केली आहे. त्याचप्रमाणे हे प्रकरण न्यायालयात असल्याने केंद्र सरकारला हस्तक्षेप करता येत नसल्याचे नमूद करीत राष्ट्रीय स्तरावर आम्हाला सर्वांगीण विचार करून निर्णय घ्यावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र मराठा समाजाला समाजाच्या मागणीनुसार ओबीसीतून नव्हे तर वेगळे आरक्षण द्यावे अशीच आमची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

इन्फो-३

ट्रम्प यांच्याशी संवाद साधणार

नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी विविध विषयांना स्पर्श करतानाच अमेरिकेतील सत्तासंघर्षावरही भाष्य करताना अमेरिकन संसदेत ट्रम्प समर्थकांनी घातलेला गोंधळ योग्य नसल्याची टीका करतानाच हा लोकशाहीचा आणि रिपब्लिकन पक्षाचा अपमान असल्याचे मत व्यक्त केले. ट्रम्प यांनीही पराभव मान्य करावा असे आवाहन करतानाच या विषयावर आपण ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.