शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या-नव्यांचा वाद नको

By admin | Updated: March 7, 2017 02:01 IST

नाशिकरोड : जुन्या-नव्यांचा वाद न करता सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी केले

नाशिकरोड : मुख्यमंत्र्यांनी नाशिकला दत्तक घेत असल्याचे जाहीर केल्यानंतर भाजपाला स्वबळावर नाशिककरांनी एकहाती सत्ता दिली. त्यामुळे नगरसेवकांची जबाबदारी वाढली असून, जुन्या-नव्यांचा वाद न करता सर्वांनी एकदिलाने काम करावे, असे आवाहन शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी केले. यावेळी मनपामध्ये भाजपा गटनेतेपदी नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांची एकमताने निवड करण्यात आली.मनपातील भाजपा नगरसेवक गटनोंदणीच्या निमित्ताने उत्सव मंगल कार्यालयात सोमवारी दुपारी भाजपा नाशिकरोड मंडलाच्या वतीने नूतन नगरसेवकांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना सानप म्हणाले की, नाशिककरांनी बहुमताने भाजपाला सत्ता दिल्याने आपली सर्वांची जबाबदारी वाढली आहे. वर्षभरापासून सर्व पदाधिकारी मनपामध्ये सत्ता आणण्यासाठी परिश्रम घेत होते. ज्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे कष्ट व परिश्रम घेतले त्यांना नक्कीच मनपा व शासनाच्या विविध समित्यांवर घेऊन त्यांचा सन्मान केला जाईल. मनपामध्ये ६६ नगरसेवक निवडून आले असून, ९० पदे मिळणार आहेत. त्यामुळे कोणीही वादविवाद करू नये. तसेच जुने-नवीन वाद करू नका. जो पार्टी वाढविण्यासाठी काम करत आहे त्यांचा मान वरिष्ठ पदाधिकारी ठेवतील, असेही सानप यांनी सांगितले.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, लक्ष्मण सावजी, विजय साने, प्रकाश घुगे आदिंची भाषणे झालीत. भाजपा नाशिकरोड मंडळाच्या वतीने सर्व नगरसेवकांचा भगवा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ कार्यकर्ते लालचंद तापडिया, नाशिकरोड मंडल अध्यक्ष बाजीराव भागवत, योगेश भगत, युनूस सय्यद, शांताराम घंटे, हेमंत गायकवाड, संजय शिरसाठ, सतीश रत्नपारखी, सचिन हांडगे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी सर्व नगरसेवकांना पारदर्शक कारभाराची शपथ दिली. भाजपा गट नोंदणीविभागीय आयुक्त कार्यालयात भाजपा नगरसेवकांची आयुक्त एकनाथ डवले यांच्यासमोर गट नोंदणी करण्यात आली. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)